राज्यात कोरोनाच्या २२०८४ नव्या रुग्णांची नोंद; ३९१ मृत्यू

भारतात एका दिवसात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा पुन्हा एकदा उच्चांक

मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या २२०८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या ३९१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १०, ३७, ७६५ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी २,७९,७६८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ७,२८,५१२ लोकांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे राज्यातील २९११५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. 

राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.८१ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत ५१ लाख ६४ हजार ८४० चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १० लाख ३७ हजार ७६५ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय, आज दिवसभरात  १३,४८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०२ टक्के इतके झाले आहे. 

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर समित्यांची स्थापना
कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत. राज्याची ऑक्सिजनची  गरज ४०० मेट्रिक  टन एवढी  असून  उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर १७ हजार ७५३, बी टाईप सिलिंडर- १५४७, डयुरा सिलिंडर- २३०, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक्स १४ असून आणखी १६ ठिकाणी काम सुरु आहे. 

गेल्या 24 तासांत 81,533 रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली,  12 सप्टेंबर  2020

सरकारचे लक्ष्यित धोरण आणि उपाययोजनांद्वारे भारतात सातत्याने कोविड-19 चे रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत. भारताने आज पुन्हा एकदा एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 81,533 रुग्ण बरे झाले आहेत.बरे होणारे देशातील 60% रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या  5 राज्यातील आहेत.एकट्या महाराष्ट्रात 14,000 हून अधिक तर कर्नाटकात 12,000 हून अधिक रुग्ण एका दिवसात बरे झाले आहेत.एकूण 36 लाखांहून अधिक (3624196) रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्यचा दर 77.77% वर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत देशात 97,570 नवीन सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. अतिरिक्त रुग्णांपैकी महाराष्ट्रात 24,000 हून अधिक रुग्ण आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात 9,000 हून अधिक रुग्ण आहेत.एकूण रुग्णांपैकी 60% रुग्ण हे केवळ पाच राज्यांमधील आहेत. गेल्या 24 तासांत या राज्यांमधील अधिकाधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत 1,201 मृत्यूची नोंद झाली आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 442 मृत्यू  महाराष्ट्रात तर कर्नाटकमध्ये 130 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.देशातील एकूण मृत्यूंपैकी 69% मृत्यू हे महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या पाच राज्यांमध्ये / केंद्रशासित प्रदेशात झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *