नांदेड 384 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू

377 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 12 :- शनिवार 12 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 377 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 384 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 122 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 262 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 552 अहवालापैकी 1 हजार 144 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 11 हजार 93 एवढी झाली असून यातील 6 हजार 861 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 868 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 39 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात गुरुवार 10 सप्टेंबर रोजी हदगाव तालुक्यातील तामगाव येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी साईनगर नांदेड येथील 48 वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, देगलूर नरंगल येथील 41 वर्षीय महिलेचा तसेच उस्मानगर नांदेड येथील 83 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर आज शनिवार 12 सप्टेंबर रोजी सिडको नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, इंदिरानगर लोहा येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, दीपनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे, तर तरोडा नाका नांदेड येथील 47 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 303 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 63 हजार 651,निगेटिव्ह स्वॅब- 50 हजार 410,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 384,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 11 हजार 93,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,एकूण मृत्यू संख्या- 303,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 861,आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 868,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 314, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 39,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 63.94 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *