सी.एम.आय.ए.च्या प्रयत्नांना यश-महाराष्ट्र शासनाकडून २१७ सुक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना पी.एस.आय. योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण

औरंगाबाद ,दि.१२ :औरंगाबाद,औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद येथील Package Scheme of Incentives (PSI) पी.एस.आय. अंतर्गत अनुदान मिळण्यास पत्र २१७ औद्योजकांनी जिल्हा उद्योग केंद्र तसेच उद्योग सह-संचालक, औरंगाबाद यांच्याकडे अर्ज केले होते. सदरील उद्योजक हे अनुदान मिळण्यासाठी ब-याच काळापासून प्रतिक्षेत होते.

या संदर्भात सी.एम.आय.ए. च्या पदाधिका-यांनी उद्योग मंत्री तसेच उद्योग सचिव महाराष्ट्र यांच्याशी पी.एस.आय. अंतर्गत अनुदान प्राप्त होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता.उद्योग मंत्री याच्या औरंगाबाद भेटीदरम्यान या संदर्भात वेळोवेळी सी.एम.आय.ए. पदाधिका-यांनी निवेदन सादर केले व उद्योग मंत्र्यांना पी.एस.आय. योजने अंतर्गत पात्र उद्योगांना असे अनुदान मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.सुक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना अनुदानाचे वितरण-करण्यात यावे यासाठी सी.एम.आय.ए.ने सातत्याने पाठपुरावा केला होता.

डिसेंबर, २०१९ ते मे, २०२० कालावधीसाठी अंतर्गत अनुदान पाप्त झालेल्या य़ा लाभार्थी उद्योगांमध्ये औरंगाबाद उद्योग सह संचालक  यांनी शिफारस केलेले ४२ उद्योग, जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी), औरंगाबाद यांनी शिफारस केलेले १२२ उद्योग, जिल्हा उद्योग केंद्र जालना यांनी शिफारस केलेले २४ उद्योग, जिल्हा उद्योग केंद्र, बीड यांनी शिफारस केलेले आणि १९ जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद यांनी शिफारस केलेले 10 उद्योग यांचा समावेष आहे.

पी.एस.आय. योजने अंतर्गत अनुदान या २१७ सुक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना दिलासा व काही प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळाले आहे. यासाठी उद्योग मंत्री श्री देसाई तसेच उद्योग सचिव महाराष्ट्र राज्य यांचे सी.एम.आय.ए. च्या पदाधिका-यांनी आभार मानले व धन्यावाद दिले.कोविड -१९ साथ रोगाचा प्रादुर्भावा मुळे मराठवाडा विभागातील ब-याच उद्योगांच्या उत्पादन बंद ठेवावे लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोविड -१९  प्रभावीत उद्योगांना राज्य सरकारकडून मदतीची त्वरित अपेक्षा आहे.

विकास, पायाभूत सुविधा आणि औद्योगिकीकरणाची बाब म्हणून मराठवाडा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मागासलेला क्षेत्र आहे.  मराठवाड्याला विकसित औद्योगिक केंद्र म्हणून वर्गीकृत करण्यासाठी पायाभूत सुविधा व औद्योगिकीकरणात मोठ्या प्रमाणात चालना आवश्यक आहे.सुक्ष्म-लघु व मध्यम उद्योगांना लागू अस्णा-या शासनाच्या योजनांअध्ये तसेच कायद्यांध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी शिफारस करण्यावर व सुधारणांवर सी.एम.आय.ए  सतत प्रयत्नशील आहे असे सी.एम.आय.ए.चे अध्यक्ष कमलेश धूत यांनी संगीतले.

लॉकडाऊनच्या कालावधीत सी.एम.आय.ए. ने केलेल्या सतत अपीलच्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा हे सांगू इच्छितो की मराठवाड्यातील उद्योगांना तातडीने राज्य सरकारकडून त्वरित मदत हवी आहे. जेणेकरून एम.एस.एम.ई. उद्योग परत पुर्वीप्रमाणे कार्यरत होण्यास मदत होइल व एकंदरीत औद्योगिक उत्पादनास गती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *