डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच महिला उच्च स्थानावर विराजमान – नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी

वैजापूर ,१५ एप्रिल  / प्रतिनिधी :-भारतीय संविधानात दिलेल्या महिला हक्कांतूनच आजच्या महिला विकासाच्या उच्च स्थानावर विराजमान आहेत आणि त्याचे सर्वस्वी श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच आहे असे प्रतिपादन वैजापूर शहरातील जीवन गंगा सोसायटी येथील महिलांकडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात वैजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी केले.

याप्रसंगी विचारमंचावर वैजापूर मर्चंट बॅंकेचे चेअरमन विशाल संचेती, वैजापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अकिल शेठ, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राम घाडगे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर महिलांच्यावतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.   

याप्रसंगी विशाल संचेती यांनी जीवन गंगा सोसायटी येथील महिलांकडून महापुरुषांच्या विचारांना अनूसरून विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले तर अकिल शेठ यांनीही आपल्या मनोगतात महामानवाला अभिवादन करण्यासाठी सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असून या परिसरातील महिलांना अशाच उपक्रमांना सुरू ठेवण्याची आवश्यकता व्यक्त केली तर पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिला योगदानाची माहिती याप्रसंगी दिली.

महिलांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात लहान मुलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस महक स्वामी ,माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, वैजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, नगरसेविका अनिता तांबे, सुप्रिया व्यवहारे, गटशिक्षणाधिकारी मनिष दिवेकर, राजु राजपुत,साहेबराव पडवळ,विलास त्रिभुवन, विलास म्हस्के,जीवन पठारे ,शुक्लोधन मोरे,यांनीही भेट दिली  तद्नंतर बौध्दाचार्य के आर पडवळ यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवी जीवनासाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ आबासाहेब कसबे यांनी केले सुत्रसंचलन सुचित कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन रमेश जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अलका बागुल, ज्योती घाडगे, कविता कसबे, शितल नरवडे, छाया जाधव, प्रज्ञा सोनवणे, माया आढाव, सुलक्षणा जोगदंड,सागर सोनवणे, कुलदीप नरवडे,विनोद आढाव, पद्माकर कुचेकर,आरती हातोले, आशा लोहकरे मॅडम,दिलीप पठारे, देविदास लाठे,कडू गायकवाड यांनी प्रयत्न केले.भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रम, शालेय साहित्य वाटप, लेझीम पथक, मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन या उपक्रमांनी लक्ष वेधले —