जालना जिल्ह्यात 70 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

186 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.11 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 186 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्दालरे 33 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 37 व्यक्तींचा अशा एकुण 70 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12482 असुन सध्या रुग्णालयात-256 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4379, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-469, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-42328 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-54, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-70 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6240 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-35210, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-776, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3914

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-12, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3693 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-81, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-718,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-54, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-256,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-96, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-186, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4598, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1480 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-77833 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-162 एवढी आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 55 नागरिकांकडून 11 हजार 900 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 4 हजार 854 नागरीकांकडुन 10 लाख 33 हजार 474 रुपये एवढा दंड वसुल करण्याात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *