नांदेड जिल्ह्यात 396 बाधितांची भर तर बारा जणांचा मृत्यू

261 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 11 :- शुक्रवार 11 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 261 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 396 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 178 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 218 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 656 अहवालापैकी 1 हजार 183 अहवाल निगेटिव्ह आले.जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 10 हजार 709 एवढी झाली असून यातील 6 हजार 745 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 608 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 55 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 295 झाली आहे.आज बरे झालेल्या 261 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 178 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 218 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 608 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 63 हजार 62,निगेटिव्ह स्वॅब- 50 हजार 308,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 396,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 10 हजार 709,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 19,एकूण मृत्यू संख्या- 295,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 745,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 608,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 213, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 55,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 64.39 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *