बीड:पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणीसह मोठ्या ४० गावांमध्ये रॅपिड अँटीजन टेस्टसाठी तपासणी अभियान

व्यापारी, किरकोळ, भाजीपाला विक्रेते, दूधविक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोलपंप कर्मचारी यांची होणार तपासणी
Image may contain: 1 person, sitting, beard and indoor
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार

बीड, दि. ११ ::– जिल्ह्यातील पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी या ४ शहरात व सर्व तालुक्यातील लोकसंख्येने मोठा असलेल्या ४० गावात कोरोना संसर्ग ( covid-19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी, किरकोळ होलसेल विक्रेते, भाजीपाला-फळभाज्या विक्रेते, दूधविक्रेते, बँक कर्मचारी, पेट्रोलपंप कर्मचारी आणि कन्टेनमेंट झोन मधील नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार असून यासाठी तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे, याबाबत कार्यवाहीचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

सदर अभियान या ४ शहरांमध्ये व ४० गावांमध्ये 14 ते 16 सप्टेंबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्ह्यातील बीड, गेवराई , अंबाजोगाई, परळी, माजलगाव , केज व आष्टी याठिकाणी मोठ्या संख्येने तपासणी करण्यासाठी मोहीम राबवण्यात आल्या आहेत. अभियानच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीसाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी , नगर परिषदांचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि पोलीस अधिकारी या सर्व प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करून कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.

मोहीम राबविण्याताना अँटीजन तपासणी केंद्र सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वा. पर्यंत सुरु राहणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *