“मी जगेन किंवा मरेन, पण तुमचे पितळ उघडे पाडेन”

कंगना रानौतकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, म्हणाली…

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या मुंबईमध्ये प्रस्थान होताच अनेक ठिकाणी निदर्शने झाली. कोणी तिच्या सोबत उभे राहिले, तर कोणी तिच्या विरोधात. मात्र तरीही तिने ट्विटरवरून टीका करणे काही सोडले नाही. आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहर यांचे नाव घेत, ‘तुमचे पितळ उघडे पडेन असा इशाराच दिला आहे. कंगनाच्या मुंबईमध्ये येण्याने मात्र आता महाराष्ट्रातील वातावरण मात्र चांगलेच तापलेले आहे. मुंबई महापालिकेकडून तीचे पाली हिल स्थित कार्यालय तोडण्यात आल्यानंतर नेपोटीझम आणि शिवसेना विरुद्ध कंगना रानौत हा वाद आता चांगलाच वाढणार आहे.

कंगनाने ट्विट केले आहे की, “उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांच्या गँगने माझे कार्यालय तोडले. या आता माझे घर तोडा, तोंड तोडा. गुपचुपपणे तुम्ही काय करता, हे देशाने पाहावे. मी जगेन किंवा मरेन, मात्र, तुमचे पितळ उघडे पाडणारच.” अशी टीका तिने केली आहे.
  
Shivsena “गेल्या २४ तासांमध्ये अचानक माझे कार्यालय अवैध घोषित करण्यात आले. कार्यालयातील फर्निचर व इतर वस्तूंचे त्यांनी पूर्णपणे नुकसान केले. ते पुन्हा माझ्या घरी येतील आणि उरले-सुरले सर्व तोडतील, अशा धमक्या मला येत आहेत. याचा मला आनंद आहे की, फिल्म माफियांच्या आवडत्या मुख्यमंत्र्याविषयीचे माझे मत खरे ठरले.” असेही तिने टि्वटमध्ये म्हटले आहे.

अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत पोहोचली. यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, ती आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय. यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. व्हिडिओ शेअर करत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. 

तुमने जो किया अच्छा किया. उद्धव ठाकरे आज माझं घर तोडले आहे, उद्या तुमचे गर्वहरण होईल, असे कंगनाने म्हटले आहे. यावेळी कंगनाने पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत असे म्हटले होते. त्यावेळी कोणाच्या बापात हिम्मत आहे, मला कोण आडवते, अशी तिने म्हणत आपण ९ तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान दिले होते. यानंतर बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली.

कंगनाने व्हिडिओ शेअर करत म्हटले, ‘उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते. फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटले आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटते, हे मला आज समजले. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र’.

दरम्यान, कंगना रानौत मुंबई विमानतळावर येत असल्याने भारतीय कामगार सेनेने मुंबई विमानतळावर आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आंदोलन न करण्याची सूचना देवूनही आंदोलन केलं गेल्यानं, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *