महाविकास आघाडीच्या सभेची जोरदार तयारी

छत्रपती संभाजीनगर,२९ मार्च  / प्रतिनिधी :-  महाविकास आघाडीची २ एप्रिलला होणारी सभा ऐतिहासिक होणार हे नक्की. आठवडाभरापासून ठिकठिकाणी बैठकांसह आता थेट जनसामान्यांशी संवादाच्या माध्यमातून सभेचे निमंत्रण देण्याचा धडाका सुरू आहे. 

२ एप्रिलच्या सभेत पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणकोणत्या विषयांवर आपले प्रखर मत मांडतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अतिविराट सभेचे नियोजन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात केले जात आहे.या सभेसाठी आज (२९ मार्च) शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांच्या बैठकाही घेतल्या असून कामगार सेना, वाहतूक सेना, अल्पसंख्याक व दलित आघाडी, व्यापारी आघाडी, दिव्यांग सेना आघाडी, युवा सेना तसेच अन्य संघटनांच्या बैठकाही घेतल्या जात आहेत. यामध्ये केवळ शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. बैठकीत आपल्या विचाराच्या लोकांना सभेसाठी निमंत्रण देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्षनेता अंबादास दानवे  यांनी केले.

याप्रसंगी व्यापारी आघाडी जिल्हा संघटक संजय लोहिया, दलित आघाडी जिल्हा संघटक राजीव वाकुडे, शहर संघटक वैजनाथ मस्के, दिव्यांग सेना जिल्हा संघटक शाहूराज चित्ते, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा संघटक समीर कुरेशी शेखर रब्बानी, व्यापारी आघाडी उपजिल्हा संघटक रवी लोढा, मनीष भारूका, वल्लभ भंडारी, अतूल सरवदे, विजय सूर्यवंशी, रमेश रुणवाल, अर्जुन  बोरखडे, अरविंद नाहटा, राजू जयस्वाल, संतोष शिंनगारे, देवा जाधव, दिव्यांग आघाडी सेनेचे इब्राहिम शेख, आबासाहेब जाधव, कांतीलाल कोल्हे, अनिल बनकर, अशोक पंडित, अर्जुन मगरे, जाऊसिंग राठोड, लालसिंग पेंढारकर ,रवींद्र बनकर, नरसिंग कोटिया, आयुब खान बनेर खान, माणिक पगडे, अल्पसंख्यांक व दलित आघाडीचे शहर संघटक शेख अखिल, शेख आसिफ, राज चौतमाल, योगेश शिरसाट ,सुंदर साळवे, घोरपडे काका, यश धुळध्वज, किशोर जाधव, रवींद्र बनकर, रवी बनकर, बाबू पेंटर, शेख मुदसशीर, मधुकर घोरपडे, शेख अथर, अन्वर फारुकी, शेख गफूर, सय्यद इमरान अली, डॉक्टर शब्बीर बेग, अखलाक कुरेशी, वाकेकर, नवगिरे, जाधव आधी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज सभा स्थळाची पाहणी राज्याचे  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, आमदार सतीश चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी महापौर नंदकुमार घोडेले पीआय शिंनगारे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शेख युसुफ लीडर यांनी केली.