मतभेदांना मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे- राहुल गांधी भेट होणार

सावरकरांचा अपमान प्रकरणः संजय राऊतही दिल्लीत गांधींना भेटणार

मुंबई, २७ मार्च/प्रतिनिधीः- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अपमानकारकरित्या उल्लेख केल्यानंतरच्या परिस्थितीत मतभेद मिटवण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची लवकरच भेट होणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी म्हटले

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनीदेखील याच मुद्यावर राहुल गांधी यांची भेट घेऊन मतभेद मिटवण्याची घेण्याची घोषणा केली. गांधी यांनी सावरकरांच्या नावाचा अशिष्टरित्या उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी शिवसेना-भाजप सरकारने ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा अपमान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान करू नका, असे जाहीरसभेत आवाहन केले होते. “मी माफी मागणार नाही कारण मी सावरकर नाही, मी गांधी आहे,” असे राहुल गांधी म्हणाले होते.
राहुल गांधी यांना ठाकरे यांनी त्यांच्या भाजपविरोधातील संघर्षात पूर्ण पाठिंबा जाहीर करताना त्यांना कटाक्षाने आवाहन केले की, सावरकर हे आमचे आदर्श असून त्यांच्यावर टीका करणे थांबवा.”.
“मी राहुल गांधी यांना जाहीरपणे आवाहन करतो की, तुम्ही देशासाठी लढण्याचे मोठे काम करीत आहात. पण, सावरकर हे आमचे आदर्श आहेत. त्यांचा कोणताही अपमान आम्ही सहन करणार नाही.” असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी रविवारी मालेगावात (जिल्हा नाशिक) प्रचंड मोठ्या जाहीरसभेत त्यांना दिला.

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा देत संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे आणि तशा प्रकारची वक्तव्ये सहन केली जाऊ शकत नाहीत. येत्या एक-दोन दिवसांत मी राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन हा विषय चर्चा करून कटुता न येता मिटवणार आहे.

तत्पूर्वी, शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल गांधी यांनी त्यांच्या गेल्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील टप्प्यात भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यांना आक्षेप घेतले होते.
तथापि, काँग्रेसने महाविकास आघाडीशी संबंध तोडण्याची शक्यता फेटाळून लावली. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि खासदार रजनी पाटील यांनी सावरकर मुद्यावर आमची भूमिका ही स्पष्ट आहे, असे म्हटले.

सत्ता गेली तरी बेहत्तर! विचार सोडणार नाही, नानांनी ठाकरेंना सुनावले

मुंबई : उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना निशाणा केल्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खडेबोल सुनावले आहेत. सत्ता गेली तरीही बेहत्तर पण विचारांशी तडजोड करणार नाही. राहुल गांधी आपला विचार मांडत आहेत. उद्धव ठाकरेही त्यांचे विचार मांडत आहेत. आमच्या किमान समान कार्यक्रमात सावरकर हा मुद्दा नव्हता. आम्ही सर्व धर्म समभाव या विषयावर एकत्र आलो होता. सत्ता येईल पण विचारांशी तडजोड करणार नाही, असेही नाना म्हणाले.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर आपण त्यांनाही इशारा देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुन नाना पटोलेंसह अन्य काँग्रेस नेतेही दुखवावल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी तसे वक्तव्य करायला नको होते, अशी राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये दबक्या आवाजच चर्चा आहे. याबद्दल सोमवार, दि. २७ मार्च रोजी नाना पटोलेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करण्याचे टाळले. मविआमध्ये सावरकर हा कळीचा मुद्दा बनू शकतो, असा इशारा त्यानी उद्धव ठाकरेंना दिला आहे.