अमृता फडणवीसांना धमकी देणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीला जामीन

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. अमृता फडणवीस यांना खंडणीची धमकी देण्याचा आरोप असलेल्या डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायाधीश डीडी अलमले यांनी आज हा आदेश दिला. ५० हजार जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, जयसिंघानी यांचे वडील अनिल जयसिंघानी हे देखील या प्रकरणात आरोपी असून त्यांच्या जामीन अर्जावर अद्याप सुनावणी झालेली नाही.