वैजापूर शहरात सायकल चालवा – आयुष्य वाढवा रॅलीला प्रतिसाद

वैजापूर ,२७ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर जलतरण व सायकलिंग ग्रुप तसेच साई लक्ष चेतना प्रतिष्ठानच्या!वतीने रविवारी (ता.26) वीरभद्र मंदिर येवला रोड ते जीवनगंगा कॉलनीपर्यंत तब्बल शंभर सायकलिस्ट यांनी सायकल रॅली काढून वैजापूर शहरवासियांना” सायकल चालवा-आयुष्य वाढवा”चा संदेश दिला. या सायकल रॅलीला वैजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी व सामाजिक कार्यकर्ते  धोंडीरामसिंह राजपूत यानी हिरवा ध्वज दाखविला. या रॅलीच्या अग्रभागी स्वतः स्वामी सायकल सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याच उपस्थितीत समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात झाला.

याप्रसंगी भारतातील पहिले दिव्यांग “आयर्न मॅन” दृष्टी नसताना ज्यांनी तब्बल- 90 किलोमीटर  सायकल चालविण्याचा, 21 किलोमीटर धावण्याचा आणि समुद्रामध्ये 02 किलोमीटर पोहण्याचा जागतिक विक्रम केला असे निकेत दलाल  यांनी उपस्थित सायकलिस्ट यांना सायकल चालविण्यासाठी अंध असताना ही त्यांनी केलेले प्रयत्न आपल्या अनुभवातून विशद केले. सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, नाशिक सायकलिस्ट संघाचे डॉ.आबा पाटील, येवल्याचे राजेंद्र कोटमे व धोंडीरामसिंह राजपूत यांनी “सायकल चालवा-आयुष्य वाढवा” या उपक्रमातून सायकल चालविण्याचे लाभ उपस्थितीतांना आपल्या अनुभवातून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राध्यापक ज्ञानेश्वर,जाधव होते.

याप्रसंगी नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, डॉ.ईश्वर अग्रवाल,अँड.पी.टी.थावरे, चंद्रशेखर मूळे, संजय बोरणारे, अँड. नानासाहेब जगताप, डॉ. सोमनाथ जगताप, बाबासाहेब जगताप, दिलीप अनर्थे, सारिका जगताप, संगीता जगताप, श्रीमती थावरे ,दत्ता भिंगारे, मधुकर तांबे, यशवंत धोत्रे, संतोष डमाळे, बाबा वारकर,धनंजय भावे,भास्कर खरात, शिवाजी भन्साळे, योगेश बोर्डे आदी उपस्थित होते.