नांदेड जिल्ह्यात 408 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

246 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 9 :- बुधवार 9 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 246 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 408 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 132 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 276 बाधित आले.

आजच्या एकुण 1461 अहवालापैकी 990 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 9 हजार 986 एवढी झाली असून यातील 6 हजार 363 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेल्याची टक्केवारी 65.96 एवढी आहे. एकुण 3 हजार 283 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 39 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

मंगळवार 8 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यातील किशोरनगर नांदेड येथील 52 वर्षाची महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, वाडी बुद्रुक नांदेड येथील 48 वर्षाची महिला खाजगी रुग्णालय येथे तर बुधवार 9 सप्टेंबर 2020 विजयगड कंधार येथील 65 वर्षाचा एक पुरुष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, गणेशनगर नांदेड येथील 72 वर्षाची एक महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

आज बरे झालेल्या 246 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 123 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 276 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 283 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीघेतलेले स्वॅब- 59 हजार 228,निगेटिव्ह स्वॅब- 46 हजार 985,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 408,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 9 हजार 986,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 12,एकूण मृत्यू संख्या- 280,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 363,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 283,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 523, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 39.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *