परभणी जिल्ह्यात 784 रुग्णांवर उपचार सुरू, 51 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 9 :- जिल्ह्यातील 51 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3512 एवढी झाली आहे. त्यापैकी 2589 बरे झाले तर 139 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 784 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

30 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर आज रोजी 2 रुग्ण मृत्यू झाले आहेत. आयसीएमआरच्या गाईड लाईननूसार 10 दिवसांचा कालावधी पुर्ण केलेल्या रुग्णांना जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेतून उपचार पुर्ण झाल्यानंतर 315 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील व परभणी जिल्ह्याचे परजिल्ह्यात उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची एकुण 312 रुग्णांची नोंद आज दि.8 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात आली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा डोनेशनची सुरुवात करण्यात आली असून आज एका कोरोना बाधित रुग्णाने उपचार पुर्ण झाल्यानंतर स्वयंस्फुर्तीने प्लाझ्मा दान केले आहे. कोरोना बाधित रुग्णांनी उपचारपुर्ण झाल्यानंतर प्लाझ्मा दान करुन कोरोना रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे. असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *