हिंदु नववर्ष स्वागत समिती तर्फे आज बुधवारी गुढीपूजन  व भव्य शोभायात्रा

संस्थापक अध्यक्ष माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची हिंदु संघटना व सांप्रदाय यांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर,२१ मार्च  / प्रतिनिधी :-   हिंदु नववर्ष स्वागत समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या हिंदु नववर्ष स्वागत समितीतर्फे भव्य शोभायात्रा व गुलमंडी येथे बुधवार, २२ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता  गुलमंडी येथे गुढीपूजन होईल.  यंदाचे १८ वे वर्ष असुन, दरवर्षी गुढीपाडव्याला शहरात पारंपारीक पध्दतीने घोडे, उंट, चित्ररथ, सजीव निर्जीव देखावे यांच्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

          हिंदु धर्मीयांसाठी भगवान श्री रामचंद्र हे महावंदनीय आहेत. प्रभु रामचंद्रानी वालीचा वध करुन अयोध्येत परतण्याचा पवित्र दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा यालाच हिंदु नववर्ष व गुढीपाडवा म्हणुन मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर संभाजीनगरातही पारंपारीक वेशभुषेत मोठया प्रमाणात हिंदु संघटना व संप्रदायाचे अनुयायी हिंदु नववर्ष शोभायात्रेत मोठया संख्येने सहभागी होतात. 

प्रथेप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याची भव्य शोभायात्री शहराचे आराध्य दैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती येथुन दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. श्रीरामाचे नामस्मरण करत १०८, भागवताचार्य श्री. गोपालानंदजी महाराज श्री पारलेश्वर संस्थान कन्नड, यांच्या अमृतवाणीने या शोभायात्रेचा समारोप खडकेश्वर शिवमंदिर येथे होणार आहे. या भव्य दिव्य शोभायात्रेत मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

   या रॅलीत जगद्गुरु श्री नरेंद्र महाराज, श्री संप्रदायचे निरीक्षक संदिप थोरात, संजय गाडेकर, संजय खंडागळे, महेश गायके, विजय चव्हाण, अक्षय शिंदे, सुभाष भुमे, रमेश वैष्णव, प्रशांत जोशी, संतोष मोटे, विठ्ठल गायकवाड, अभिजीत पगारे, अ‍ॅड. शिवाजी इंजेपाटील, शेषराव चव्हाण, श्री संप्रदाय प्रबोधनकार निर्मला संजय खंडागळे, सौ. जयश्री मनोहर नाईक, संगिता सांडु लोखंडे, कुमार येळीकर, महेश पवार, अनिल शिंदे, सुमित लंके, सुमित डेडवाल, उत्त्तम डफाडे, लक्ष्मी नरहिरे, श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थीक ट्रस्टचे अकिल अब्बास, हितेन पटेल, मनोज जैस्वाल, जितेश खुराणा, किशोर देशमुख, कमलेश वैष्णव, नुपुर कनकंदडे, श्री सद्गुरु किसनगीरी बाबा संस्थानचे राम विधाते, बजरंग विधाते, स्वा. सावरकर प्रेमी मंडळाचे भाऊ सुरडकर, विजय जहांगीरदार, राजेश मेहता, आर्य समाजाचे अ‍ॅड. जोगेंद्रसिंग चव्हाण, दयाराम बसैये, राजकमल सार्वजनिक मित्र मंडळाचे जयसिंग होलिये, विश्व हिंदु परिषदेचे सुभाष कुमावत, अ‍ॅड काशिनाथ दापके, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे कृष्णाकांत मुळे, सतिश मंडपे, मिलिंद पिंपळे, राहुल औसेकर, बजरंग दलाचे सुभाष मोकारिया, राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे किशोर शितोळे, हेमंत जोशी, देवजीभाई पटेल, पुरुषोत्तम कुलकर्णी, सुनिल चावरे, दिगंबर जैन, पंचायत समाजाचे ललीत पाटणी, विनोद लोहाडे, डि. बी. कासलीवाल, दिपक पंडया, अग्रवाल दिगंबर जैन मंदिराचे सुधीर सावजी, डॉ. जितेंद्र लोहाडे, सुनिल पन्नालालसा साहुजी, संजय सावजी, माहेश्वरी समाजाचे शिवप्राद तोतला, संतोष लड्डा, संजय मंत्री, प्रफुल मालानी, इश्वर चिचाणी, संजय सारडा, मुकुंद गट्टानी, सौ. रेखा बागला, विजया काबरा, गुजराती समाजाचे लालाभाई पारीख, मनोज टोपीवाला विश्व जागृती मिशनचे अनंत मोताळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभंजन महाकोले, विरशैव लिंगायत समाजाचे सोमनाथ साखरे, ज्ञानेश्वर आप्पा खर्डे, शिवा खांडखुळे, पतंजली समितीचे आनंद गोरे सुभाष वेदपाठक, शैलेश माकणीकर, श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्राचे नंदकुमार कुलकर्णी, समन्वयक प्रशांत मस्के, विजय सुर्यवंशी आदींसह हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.