आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उद्योजक श्री. पद्माकर मुळे यांच्या घरी सदिच्छा भेट

छत्रपती संभाजीनगर,१९ मार्च  / प्रतिनिधी :- स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जावळी, जि. सातारा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले यांनी आज छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था सचिव तथा 

उद्योजक श्री. पद्माकरकाका मुळे यांच्या सहयाद्री या निवासस्थानी आज सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले, त्यांचा सत्कार श्री. पद्माकरकाका मुळे यांनी शाल आणि पुष्पगुछ देऊन करण्यात आला.

            यावेळी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था अध्यक्ष  श्री.रणजित भैय्या मुळे, विश्वस्त श्री.समीर भैय्या मुळे, सौ. लता काकू मुळे, सौ. रोहिणी वहिनी मुळे, कु. तनिष्का, उद्योजक श्री. राजू भोसले, श्री. अक्षय जाधव, श्री. निलेश देवकर, डॉ. गिरीश मोरे, अँड. राहुल तांबे, श्री. दुष्यंत पाटील, डॉ. भरत पाटील चव्हाण आणि संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.