नांदेड जिल्ह्यात 332 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 8 :- मंगळवार 8 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 332 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 89 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 243 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 523 अहवालापैकी 1 हजार 137 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 9 हजार 578 एवढी झाली असून यातील 6 हजार 117 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 66.15 टक्के एवढे झाले आहे. एकुण 3 हजार 129 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी सावरमाळ मुखेड येथील 62 वर्षाच्या एका महिलेचा मुखेड कोविड केंअर सेंटर येथे, सोमवार 7 सप्टेंबर रोजी पेठवडज कंधार येथील 62 वर्षाचा एका पुरुषाचा, गोकुळनगर नांदेड येथील 77 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, गोपाळचावडी नांदेड येथील 23 वर्षाची एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 276 झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 57 हजार 985,निगेटिव्ह स्वॅब- 46 हजार 49,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 332,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 9 हजार 578,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 21,एकूण मृत्यू संख्या- 276,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 117,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 129,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 588, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 36.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *