मराठवाड्यात वीज पडून ४ ठार:पुढील ४ दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

वाघूर नदीला पूर आला

मुंबई,१७ मार्च  /प्रतिनिधी :-गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. यामुळे काही जिल्ह्यात शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली. आता मंगळवारी आणि बुधवारी काही शहरांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर येत्या ४ दिवसात राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच, काही भागामध्ये गारपिटदेखील होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोली, जालना तसेच पुणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईतही अनके भागांत पावसाची रिमझिम पहायला मिळाली. तसेच ठाणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे रब्बीची पिके धोक्यात आली असून गहू, हरभरासह आंबा, द्राक्ष आणि केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव व मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारीही गारपीट, अवकाळी पावसाचा कहर सुरूच होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यूू झाला. यात एका १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

उखळी (ता. गंगाखेड) येथील बाळासाहेब बाबूराव फड (६०), परसराम गंगाराम फड(४०), साडेगाव (ता. परभणी) येथील आबाजी केशव नहातकर, शेळगाव (ता. सोनपेठ) येथील ओमकार भागवत शिंदे (१५) यांचा मृतात समावेश आहे. तर इतर चार जण वीज अंगावर पडल्याने जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीसह साेयगावमध्येही वादळी पाऊस, गारपीट झाली. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ते रखडले आहेत.

वाघूर नदीला पूर आला

सोयगाव तालुक्यात आज दुपारी मुसळधार पावसाने शेतीमालाचे  मोठे नुकसान झाले तर अजिंठा लेणी त असलेला धबधबा वाहू लागल्याने वाघूर नदीला पूर आला

फर्दापूर  सावर खेडा ब व अजंठा  लेणी परिसर या  भागात पावसाचा जोर होता अनेक दिवसापासून कोरड्या पडलेल्या वाघूर नदीला पूर आल्याने अनेक पर्यटक व नागरिकांनी

 गर्दी केली