सदगुरू नारायणगिरी महाराज यांचे अध्यात्मासह स्वातंत्र्य लढ्यातही मोलाचे योगदान  –  महंत रामगिरी महाराज  

श्रीक्षेत्र सराला बेट येथे ब्रह्मलिन सद्गुरू नारायणगिरी महाराज यांची 14 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

लाखो भाविकांनी घेतले सदगुरु समाधी दर्शन                 

वैजापूर ,१७ मार्च / प्रतिनिधी :-  संताचे जीवन परोपकारासाठी असते. संत तुकाराम, संत एकनाथ, संत रविदास, संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मुक्ताबाई आदी संताचे जीवन संघर्षात गेले. सामाजिक कार्य करतांना त्यांनी कधीच लोकनिंदा व स्वार्थ बघितला नाही. मनुष्याने कितीही विद्या प्राप्त केली तरी संताशिवाय प्रसन्नता मिळत नाही. सदगुरु ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज यांचे जीवन ही मानवी हितासाठी व बेटाच्या उत्कर्षासाठी संघर्षात गेलेे. निजामाच्या जोखाडातुन मराठवाड्याला मुक्ती देण्यासाठी ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज यांनी स्वातंत्र्यय लढ्यातील योगदान हे खूप मोठे असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले .                   

श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटावर आज योगिराज गंगागिरी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज यांच्या 14  व्या पुण्यतिथी उत्सवात आयोजित किर्तन प्रसंगी “झाली संध्या संध्येय ,माझा गेला आत्माराम  हृदयी प्रगटला” संत एकनाथ महाराज यांच्या अभंग रचनेचे विवेचन करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज याना बालपणापासुन अध्यात्माची आवड होती . संतांनी सद बुद्धी रुपी आसनावर विजय मिळवला मनुष्य स्वतःला जोपर्यंत ओळखत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ संपत नाही समाधानी संताजवळ असते किती पैसा कमावला तरी मानवाला शांती मिळणार नाही शांती मिळायचे असेल तर सद्गुरुला शरण जावे लागते,अनेक महापुरुषाच्या जीवनात संघर्ष होता .सदगुरुनी संघर्ष करुन बेटाची व्याप्ती वाढवली.संकट ही एक संधी असते,जीवनात संकटात जो मात करतो तोच यशस्वी होतो.संकटे ही जीवंत माणसाकडेच येत असतात मेलेल्या कडे नाही.नारायणगिरी महाराज हे बेटाला व समाजाला मिळालेले एक रत्न होते औरंगाबादचे नामकरण  छत्रपती संभाजीनगर झाल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे गंगागिरीजी महाराज भक्त परिवारातर्फे आभार मानले धर्मवीर संभाजी महाराज यांनी स्वताच्या धर्माचे पालन करूण धर्मासाठी बलीदान दिले दुसऱ्यांच्या धर्माचा आदर केला.तरूणानी संभाजी महाराज यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर समाजामध्ये बंधुभाव एकात्मता निर्माण होईल असे महाराज म्हणाले .         

यावेळी किर्तनानंतर येवला, नांदगाव, कोपरगाव, वैजापूर, गंगापुर तालुक्यातील शेकडो गावातून आलेल्या पुरणपोळ्या, मांडे, दुध संघाच्या वतीने पाच हजार लीटर दुधाचा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत वैजापूरच्या नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, माजी  नगराध्यक्ष अध्यक्ष साबेर खान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, बाबासाहेब पाटील जगताप मनाजी मिसाळ, संजय बोरणारे, पंकज ठोंबरे, संजय निकम, बंडू वाणी, भाऊसाहेब झिंजुर्डे, बाळासाहेब कापसे ,अंकुश हिंगे, कमलाकर कोते, राजेंद्र साळुंखे, संदीप पारख, दत्तू पाटील खपके, संदीपान महाराज, बाळासाहेब महाराज, रंजाळे, गोविंद महाराज मलिक, सराला बेटाचेेे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह लाखो भाविकांची उपस्थिती होती