जायकवाडीच्या सोळा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

पैठण :जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक वाढल्याने, प्रकल्पाचे सोळा दरवाजे अर्ध्या फुटाने वर उचलण्यात आले असून यातून ८३८४ क्यूसेक, जलविद्युत केंद्रातून १५८९ क्यूसेक  व दोन्ही कालव्यातून अकराशे क्यूसेक असा एकूण ९९७३ क्यूसेक पाण्याचा गोदापात्रात विसर्ग करण्यात येत आहे.   

तीन सप्टेंबर पासून जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सुरुवातीला धरणाच्या उजव्या कालव्यातून व त्यानंतर धरणावर कार्यान्वित असलेल्या जलविद्युत केंद्र व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. मागच्या तीन दिवसांपासून धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यावर व धरणात पाण्याची आवक वाढल्यावर प्रकल्पाच्या १३, २४,१५ व १५ क्रमांकाच्या दरवाज्यातून दोन हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले.   

दरम्यान, रविवारी रात्री पासून धरणात येणारी पाण्याची आवक वाढल्यावर रात्री धरणाचे १०,२७,१८,१९,१६,२१,१४,२३,१२,२५,११,२६,१३,२४,१५ व २२ असे एकूण सोळा दरवाजे अर्ध्या फुटाने वर करून यातून ८३८४ क्यूसेक व जलविद्युत केंद्रातून १५८९ असा एकूण ८३८४ क्यूसेक गोदावरी नदीच्या पात्रात व धरणाच्या दोन्ही कालव्यातून अकराशे असा एकूण ९९७३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणातून करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.सध्या, धरणात १३२६२ क्यूसेक पाण्याची आवक सुरू असून धरणात ९८.६२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *