ईडी अ‍ॅक्शन मोडवर! हसन मुश्रीफांच्या घरी ईडीची धाड

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीनं पुन्हा एकदा धाड टाकल. हसन मुश्रीफ यांच्या घरी चार ते पाच अधिकाऱ्यांचं पथक दाखल झालं. ईडीनं गेल्या दोन ते तीन महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फेर लेखापरिक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे ईडीचं पथक पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या घरी दाखल झालं आहे.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं चालवायला घेतला होता. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केला होता. यासंदर्भात ईडीनं यापूर्वी चौकशी केली होती. आता ईडीकडून धाडसत्र सुरु करण्यात आलं आहे.

कोल्हापुरातील साखर कारखान्याच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या व्यवहारात काळा पैसा गुंतवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना विकत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर ईडीने मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापूर येथील मालमत्तांवर छापे टाकून कारवाई केली.

दरम्यान, मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. “राज्यात विरोधकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे”, असा आरोप त्यांनी याचिकेद्वारे केला आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी किरीट सोमय्या यांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते.

जनतेला लुटणाऱ्यांना हिशोब द्यावाच लागेल!

किरीट सोमय्या यांचा घणाघाती वार

मुंबई – उद्धव ठाकरेंचे भागीदार रवींद्र वायकर यांनी लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर ५०० कोटी रुपयांचे हॉटेल बांधले. अनिल परब, सदानंद कदम यांच्यावर कारवाई सुरू आहे. अनिल परबांवर तर तब्बल १२ खटले आहेत. राज्यातील जनतेला लुटणाऱ्या लुटारूंना हिशोब द्यावाच लागेल, अशा शब्दांत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटावर घणाघाती वार केला.

ते पुढे म्हणाले, १ डझन नेत्यांची आताही चौकशी, कारवाई सुरू आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. हसन मुश्रीफांनी कोट्यवधीची लूट केलीय, भ्रष्टाचार केला हे सत्य आहे. आयकर, ईडी, सीबीआय, सहकार मंत्रालयाने सगळ्यांनी चौकशी केली. हा घोटाळा १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कारवाई तर होणारच.

४० हजार शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केलीत. शेतकऱ्यांकडून १० हजार घेतलेत. ते शेतकरी कुठे आहेत? सेटलमेंटचे अर्ज का केले? आयकर खात्याच्या ऑर्डरविरोधात हायकोर्टात कोण गेले? चोरी केली ती पकडली गेली त्यामुळे आता सेटलमेंटची भाषा करावी लागली असा आरोप हसन मुश्रीफ यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कोट्यवधीचे बोगस कर्ज घेतले ते परत करा. चोरी केली ही कबूल करा. शिक्षेला सामोरे जा. हसन मुश्रीफांवर अडीच वर्षाच्या काळापासून कारवाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी कारवाई दाबण्याचा प्रयत्न केला. आता हे घोटाळे बाहेर आले. भाजपा नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते मग कारवाई का केली नाही. आजही पुरावे असतील तर कोर्टात जा, संबंधित यंत्रणांना भेटा असं आव्हान किरीट सोमय्यांनी विरोधकांना केले आहे.