नांदेड जिल्ह्यात 336 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू

181 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 7 :- सोमवार 7 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 181 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 336 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 174 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 162 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 236 अहवालापैकी 833 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 9 हजार 246 एवढी झाली असून यातील 5 हजार 834 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.46 टक्के एवढे झाले आहे. एकुण 3 हजार 78 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 41 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात रविवार 6 सप्टेंबर रोजी लोकमित्र नगर नांदेड येथील 70 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, पिंपळगाव पोरका येथील 50 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर सोमवार 7 सप्टेंबर रोजी शिवाजी चौक सिडको येथील 50 वर्षाचा एक पुरुष, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 46 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, हदगाव येथील 87 वर्षाचा एका पुरुषाचा, गोकुळनगर नांदेड येथील 70 वर्षीय एक महिला, बारड येथील 60 वर्षीय एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 272 झाली आहे.

आज बरे झालेल्या 181 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 174 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 162 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 78 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 56 हजार 533,निगेटिव्ह स्वॅब- 45 हजार 10,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 336,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 9 हजार 246,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-28,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 11,एकूण मृत्यू संख्या- 272,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 834,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 78,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 527, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 41.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *