देशाच्या प्रगतीसाठी महिलांचा मोलाचा वाटा आणि सहभाग- डॉ. काननबाला येळीकर

जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रॅली

छत्रपती संभाजीनगर,९ मार्च  / प्रतिनिधी :-  आज वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशांन्वये तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक,गिरीश महाजन (वैद्यकीय शिक्षण मंत्री) यांच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.       

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथून रॅलीचे उद्घाटन डॉ. काननबाला येळीकर (माजी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), कॅन्सर शल्य चिकित्सक डॉ. उन्मेष टाकळकर, डॉ. संगीता पाटील, जेष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रेरणा देवधर,  CCIM सदस्य आणि नोडल ऑफिसर प्राचार्य डॉ. दत्ता पाटील (उदगीर ), अपर्णा अध्यापक या मान्यवरांच्या शुभहस्ते रॅलीला सुरुवात करण्यात आली.         

डॉ. काननबाला येळीकर यांनी उद्घाटनपर भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनेक यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा असतो. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. पण तरीही तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे. कारण पुढची पिढी कशी घडवायची, हे स्त्रीच्या हातात आहे. स्त्री सन्मानाची सुरवात आपण आपल्या घरापासून करायला हवी. माझ्या आयुष्यामधील सर्व महिला वर्गाला माझे शतश: नमन !     

रॅलीचा समारोप गुलमंडी, दयाराम बसैये बंधू यांचं दुकान, मॅचवेल, मित्तल ऑप्टिकल मार्ग महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ, औरंगपुरा येथे झाला.        

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ २५ वा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. दि. १ जानेवारी २०२३ ते दि. १० जुन २०२३ या कालावधीत विद्यापीठाद्वारे विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस अँड ट्रीटमेंट’ त्यानंतर दि. २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन (ओरल हेल्थ मिशन अवेअरनेस) आणि दि. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य  दिनानिमित्त  (कॅटरॅक्ट /थायरॉईड अवेअरनेस) या आजाराबाबत जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयाद्वारे करण्यात येत आहे.          

यावेळी डॉ. संदीप कांबळे, डॉ. शीतल अंतापूरकर, डॉ. वैजनाथ यादव, डॉ. राजन महिंद्र, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. गणेश डोंगरे, अशोक आहेर, संजय अंबादास पाटील तसेच म. आ. वि. वि. सलग्नित सीएसएमस   आयुर्वेद महाविद्यालय, सीएसएमस  दंत  महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय, धनेश्वरी आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, साई आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, डी. के. एम. एम. होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय, फोस्टर डेव्हलपमेंट होमियोपॅथी महाविद्यालय, सायली होमियोपॅथी वैद्यकीय महाविद्यालय, श्री भगवान होमियोपॅथी मेडिकल कॉलेज, स्वातंत्र्यसेनानी स्व. उत्तमराव पाटील परिचर्या महाविद्यालय, कमलनयन बजाज परिचर्या महाविद्यालय, डॉ.  हेडगेवार परिचर्या महाविद्यालय, शासकिय दंत महाविद्यालय, आनंद आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, डॉक्टर, विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.         

यावेळी प्रास्ताविकसीएसएमस   आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य तथा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अमित वांगीकर, सूत्रसंचालन डॉ. लता काळे यांनी केले.