भ्रूणहत्येतील दोषी सुदाम मुंडेला पुन्हा अटक ,परळीत डॉ. मुंडे हॉस्पिटलवर छापा

बीड :जिल्ह्यातील परळी येथील स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी दोषी असलेला सुदाम मुंडे जामीनावर बाहेर आल्या नंतर राजरोस वैद्यकीय व्यवसाय
करीत असल्याचे उघड झाले आहे .

बीड जिल्हा हा मागच्या  काही वर्षात स्त्री भ्रूण हत्ये साठी चर्चेत आला होता .बीड जिल्ह्यातील परळीतील स्त्री भ्रूण  हत्या प्रकरण गाजले  . बीड जिल्ह्यातील परळी येथील डॉक्टर सुदाम मुंडे  व सरस्वती मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटल यांचे नाव यात पुढे आले होते .   स्त्रिभ्रूण हत्या प्रकरणाने बीड जिल्हा बदनाम झाला मात्र या बदनामीचे केंद्र राहिले ते परळी आणि परळीचे डॉकटर मुंडे दांपत्य 2010 साली  मुंडे  हॉस्पिटलमध्ये स्टिंग ऑपरेशननंतर सोनोग्राफी मशिन सील झाले.    जून २०११ ला काही तेथे काही मृत भ्रूण   सापडले.  
व त्यांनतर  सुदाम मुंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला .मात्र  अटकेनंतरही सुदाम मुंडेत सुधारणा झाली  नाही. पुन्हा त्याचा अवैध गर्भपात करण्याचा प्रकार सुरूच होता . गर्भपात करण्याचा परवाना नसताना हे उद्योग तिथे सुरू होते .अठरा मे 2012 रोजी परळी येथील डॉक्टर   सुदाम आणि सरस्वती मुंढे यांच्या रुग्णालयात गर्भपात करत असताना धारूर तालुक्यातील भोपा येथील विजयमाला महादेव  पटेकर या महिलेचा मृत्यू झाला  .डॉकटर मुंडे हॉस्पिटलमध्ये मागच्या काही वर्षा  पासून कोवळ्या कळ्या खुडण्या चे काम राजरोस सुरू होते. हे या महिलेच्या मृत्यूवरुन स्पष्ट झाले होते  . सुदाम मुंडे यांच्या कडे गर्भलिंग निदान करण्यासाठी आणि गर्भपात करण्यासाठी मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ  आणि सीमा लगतच्या राज्यातून लोक येत असत .एवढच नव्हे तर सुदाम मुंडे यांच्या रुग्णांना जळगाव येथील डॉक्टर
राहुल कोल्हे यांच्या रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी पाठवले जात होते हे तपासात उघड झाले . पण त्या नंतर मात्र सामाजिक संघटना रस्त्या वर उतरल्या. माध्यमांनी सरकार वर इतका दबाव वाढवला की जिल्ह्यातील
आरोग्य यंत्रणे सोबतच महसूल प्रशासन आणि पोलिस प्रशासन अंग झाडून स्त्री
भ्रूण हत्या प्रकरणी दोषींना शिक्षा होण्यासाठी    कामाला लागले. मात्र विजयमाला पटेकर हिच्या मृत्यू नंतर डॉक्टर  सुदाम आणि
सरस्वती मुंडेने  स्थानिक कोर्टा कडून जमीन मिळवला होता. आणि सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे फरार झाले . त्याच्या शोधासाठी चार राज्यात पोलिस मागावर  होती.सुदाम या काळात चार राज्यात फिरला.यात त्याने काही ठिकाणी विमानाने ही प्रवास केला या वेळी त्याच्या कडे 22 सिम कार्ड आणि दहा मोबाइल हँडसेट वापरले  16 जून 2012  ला डॉक्टर  सुदाम आणि सरस्वती मुंडे परळी  पोलीसा च्या समोर हजर झाले .व त्यानंतर डॉक्टर सुदाम मुंडे   सरस्वती मुंडे यांना एका प्रकरणात   चार वर्षांची शिक्षा त्यास सुनावली होती व ते  स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी जेलची हवा खात होते  .तर  नंतर डॉक्टर सरस्वती मुंडे यांना न्यायालयाने जामीन दिलेला होता .
सुदाम मुंडे यांनी चौकशीत आपण शेकडो कळ्या जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटात खुडल्याचे कबूल केले होते .बीडमध्ये घडलेल्या या स्त्रीभ्रूण  प्रकरणा नंतर खुद्द राज्याच्या तत्कालीन  आरोग्य मंत्र्यांना बीड मध्ये येवून बैठकघेवून या प्रश्नाची दखल  घ्यावी लागली होती .या प्रकरणात साक्षीदारावर दबाव येईल म्हणून परळी आणि अंबाजोगाई येथील कोर्टातील सुनावणी बीडच्या न्यायालयात वर्ग करण्यात आली होती . व बीडच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली .बीड जिल्ह्यातील परळी येथील डॉकटर सुदाम मुंडे यांच्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी  बीड न्यायालयाने डॉकटर सुदाम व सरवस्ती मुंडे तसेच मृत विजयमाला पटेकर हीचा पती  महादेव पटेकर   यांना  दोषी ठरवले . या प्रकरणात मृत महिलेचे नातेवाईकांनी साक्ष फिरवली .अनेक साक्षीदार बदलले मात्र सरकारी यंत्रणेने  दिलेल्या पुरावा व साक्षी आधारे  मुंडे दांपत्य व महादेव पटेकर यास  दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने दिली होती . मात्र शिक्षा झाल्यानंतर जामिनावर बाहेर असलेल्या डॉकटर सुदाम मुंडे याने परळीत आपला दवाखाना सुरू केला होता .याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मिळाली .या माहितीवरून त्यांनी आरोग्य आणि महसूल यंत्रणेला कामाला लावले .शनिवारी रात्री उशिरा जिल्हा शल्य चिकित्सकअशोक थोरात  परळीचे उपविभागीय अधिकारी  महाडिक व तहसीलदार बिपीन पाटील यांनी मुंडे हॉस्पिटल मध्ये छापा टाकला .डॉकटर अशोक थोरात यांनी या संदर्भात सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मुंडे हॉस्पिटल मध्ये छापा टाकला .डॉकटर मुंडे यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आलेला असताना  ते वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे त्या ठिकाणी चार रुग्ण ऍडमिट असल्यावरून  निदर्शनास आले . यात दोन रुग्णावर ऑक्सीनज पुरवठा करण्यात येत होता.तर एक फॅक्चर  झालेला रुग्ण उपचार घेत होता . त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्य होते .आम्ही रविवारी पहाटे साडे सहा वाजण्याच्या दवाखाना सील केला असून डॉकटर मुंडे यास परळी शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . परळी येथील  स्थानिक  वैद्यकीय अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे . असे अशोक थोरात यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *