भाजप कार्यकर्त्यांनी होलिका उत्सवामध्ये औरंगजेबचे पोस्टर व पुतळा दहन केला

छत्रपती संभाजीनगर,६ मार्च  / प्रतिनिधी :-  भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथे होलिका उत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते.भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर , महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे ,भाजपा अनुसूचित मोर्चा प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे , यांच्या नेतृत्वात औरंगजेबचा पुतळा व पोस्टर होलिका उत्सवामध्ये दहन करण्यात आले.

ज्या औरंगजेबाने देशांमधील तमाम मठ , मंदिर ,गुरूद्वारा ,बौद्ध विहार , लेण्यावर हल्ले करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तमाम हिंदूंनी या मोघलांना चारशे वर्षे निकराची लढाई दिली  छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज ,यांनी व त्यांच्या मावळ्यांनी या मोगलांना याच ठिकाणी त्यांना  पराभूत केले , पंरतु औरंगजेबाने देशा मधील प्रमुख मंदिरांवर आक्रमण करून त्यांचे इस्लाम मध्ये परिवर्तन केले ,अनेक हिंदूंना धर्मांतरित केले , त्याचे नाव शहराला होते ,ते नाव शिंदे फडणवीस सरकारने बदलले , मागील 35 वर्षापेक्षा अधिक काळापासून शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात यावे , अशी मागणी होती , या जनभावनेचा आदर राखून शिंदे फडणवीस सरकारने , शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले , त्या मुळे येथील एम आय एम चे कार्यकर्ते व नेते हे उपोषणाला बसले असून , त्या ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर झळकवले जात आहेत ,तसेच शहराचे नांव पूर्वत करण्यात यावे या साठी बिर्याणी खाऊन उपोषणाचे नाटक करत आहेत, या प्रवृत्तीला विरोध करण्या साठी , छत्रपती संभाजी महाराज यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते व मावळे यांनी औरंगजेबाचा पुतळा व पोस्टर होळीमध्ये टाकून त्याचे दहन केले ,

हिंदूंच्या  स्वाभिमान , अभिमान साठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावरची लढाई करण्या साठी तत्पर आहे , त्याचेच प्रतीक म्हणून वाईट प्रवृत्तीचा निषेध करण्या साठी औरंगजेबाचा पुतळा जाळण्यात आला , या वेळी कार्यकर्त्यांनी जो हिंदू हित  की बात करेगा , वही देश पे राज करेगा , औरंगजेबाचे व एम आय एम च्या  खासदारचे करायचे काय ,खाली मुंडक वर पाय , छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवाजी ,भारत माता की , जय , वंदे मातरम या प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला , या वेळी अरविंद डोणगावकर ,अजय शिंदे ,मुकुंद लाडकेकर , राजू खाडे शंकर म्हात्रे ,राम बुधवंत , नंदू गवळी , गोविंद केंद्रे ,योगेश वाणी , सचिन गुगळे ,विवेक राठोड ,महेश मोहरीर, शिवाजी बनसोडे ,कुणाल खरात , प्रकाश शेंडगे ,राजेश साळवे, राहुल शिरसाट ,विशाल गाडे , शरद वंजारे , विजय सदावर्ते ,रावसाहेब खरात , उत्तम कांबळे , अभिषेक खाडे,सुनील खरात , यशवंत पवार , सिद्धांत खरात , अक्षय शेंडगे ,पवन गायकवाड , प्रशांत सदावर्ते ,रोहित जाधव ,अभिषेक धुळे, सुरेश गायकवाड ,विजय साबळे ,आधी नेते कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते .