लग्नाचे आमिष दाखवून पीडित विवाहितेवर बलात्‍कार:दुकानदारास कोठडी

छत्रपती संभाजीनगर,६ मार्च  / प्रतिनिधी :-  लग्नाचे आमिष दाखवून पीडित विवाहितेवर वारंवार बलात्‍कार आणि अनैसर्गिक बलात्‍कार करुन लग्नास नकार देणार्या दुकानदाराला जिन्‍सी पोलिसांनी शनिवारी दि.४ रात्री बेड्या ठोकल्या. आरोपीला ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.एच. खेडकर यांनी रविवारी दि.५ दिले. मोहम्मद सिद्दीकी युसूफ मोतीवाला (४७, रा. मकसुद कॉलनी, रोशन गेट) असे आरोपी दुकानदाराचे नाव आहे.

प्रकरणात ४० वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्‍यानूसार, १४ वर्षांपूर्वी पीडितेला पतीने तलाक दिला. तेंव्‍हापासून ती आपल्या एका मुलासह वेगळी राहते. २०१८ मध्‍ये घरात सुरु असलेल्या नळ पाईल लाईनचे सामान आणण्‍यासाठी पीडिता आरोपीच्‍या बायजीपुरा येथील अॅक्मे पाईप हाऊस या दुकानात गेली होती. मात्र सामानाचे पैसे अपुरे पडले, त्‍यावेळी आरोपीने काही पैसे उधार ठेवले, व राहिलेले पैसे नंतर द्या म्हणत पीडिताचा मोबाइल क्रमांक घेतला. त्‍यानंतर आरोपी पीडितेला वारंवार फोन करुन पैशाची मागणी करित होता. त्‍यामुळे पीडिता त्‍याला भेटण्‍यासाठी दुकानावर गेली. तेंव्‍हा आरोपीने पीडितेला सहानुभूती दाखवत तिला गोडावूनवर घेवून गेला. तेथे आरोपीने तिला शरबत पाजले, पीडितेला तासाभरानंतर जाग आली, तेंव्‍हा बलात्‍कार झाल्याचे तिच्‍या लक्षात आले. तिने आरोपीला जाब विचारला असता त्‍याने, तिला लग्नाची गळ घातली. त्‍यावर पीडितेने नकार दिला असता, घडलेल्या प्रकाराची मोबाइल मध्ये रेकॉर्डींग केली आहे. ती रेकॉर्डींग नातेवाईकांना पाठवून बदनामी करेन अशी धमकी दिली. त्‍यानंतर आरोपी पीडितेच्‍या घरी जावून तिच्‍यावर वारंवार बलात्कार आणि अनैसर्गिक बलात्कार केला. पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता, लग्न करण्‍यास नकार देत रेकॉर्ड केलेला व्‍हीडीओ नातेवाईकांना पाठविण्‍याची आणि जिवे मारण्‍याची धमकी दिली. प्रकरणात जिन्‍सी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी पीडितेला पाजलेल्या शरबत मध्‍ये गुंगीकारक औषधी होती काय याचा तपास बाकी आहे. आरोपीने रेकॉर्डींग केलेला मोबाइल व गुन्‍हा करतेवेळी परिधान केलेले कपडे हस्‍तगत करायचा आहे. तसेच आरोपी गुन्‍ह्यात आणखी कोणी मतद केली काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.