वैजापूर शहर व परिसरात अवकाळी पाऊस ; रब्बी पिकांचे नुकसान, शेतकरी हवालदिल

वैजापूर ,६ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर शहर व परिसरात सोमवारी (ता.06)  रात्री अवकाळी पाऊस झाला.या पावसामुळे कांदा, गहू व हरभरा या रब्बी पिकांचे नुकसान होणार आहे. काल अधून मधून ढगाळ वातावरण होते.उष्माही वाढला होता. रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता.

सध्या तालुक्यात गहू व हरभरा काढणी सुरू आहे त्यात हे संकट उभे राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

गहू व हरभरा सोंगणीचे काम सुरू असतांनाच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे कापणी केलेले गहू व हरभरा पीक पावसात भिजले. कांद्याला बाजारभाव नाही त्यात अवकाळी पावसाने गहू व हरभरा पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.