ठाकरे गटाच्या खासदारानेच दिला उद्धव ठाकरेंना घरचा आहेर

हिंगोली,५ मार्च  / प्रतिनिधी :-शिंदेंसह ४० आमदार पक्षातून बाहेर पडल्यावर सर्वजण उद्धव ठाकरे यांनाच जबाबदार ठरवत असताना आता परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनीच देखील या परिस्थितीला उद्धव ठाकरेंना जबाबदार धरत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना मंत्री करायला नको होते. त्यांनी कुणाकडे तरी पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे होतं, असं वक्तव्य खासदार संजय (बंडू) जाधव यांनी केलं आहे. तुम्ही खुर्ची आटवल्याने त्यांना वाटलं की, वेगळी चुल मांडली, तर काय बिघडलं? आणि याच भूमिकेतून हा प्रकार घडला असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाच घरचा आहेर दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रा सुरु आहे. मात्र याच शिवगर्जना यात्रे निमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे चुकले असे स्पष्टपणे सांगत नाराजी व्यक्त केली.

बंडू जाधव म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पक्ष संघटनेला वेळ दिला नाही म्हणून आमच्यावर ही वेळ ओढावली. असा टोलाही संजय जाधव यांनी शिंदे गटाला लगावला.