लाच स्विकारणाऱ्या सहायक पोलिस निरिक्षक मानसिंग घुनावतला कोठडी
छत्रपती संभाजीनगर,५ मार्च / प्रतिनिधी :- एका व्यक्तीकडे असलेले पैसे वसुल करून देण्यासाठी, तक्रारदात्याकडून १० हजार रूपयांची लाच स्विकारणाऱ्या सहायक पोलिस निरिक्षक मानसिंग रायासिंग घुनावत (४२) याला सोमवारपर्यंत दि.६ पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी रविवारी दि.५ दिले.
प्रकरणात ४५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली. त्यानूसार तक्रारदात्याची जमीन व्यवहारात दोन लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. फसवणूक करणारे व्यक्ती पैसे देत नसल्याने, त्याने एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावर कार्यवाही होत नसल्याने, त्यांनी सहायक पोलिस निरिक्षक मानसिंग घुनावत यांच्याशी संपर्क केला. घुनावत यांने गैर अर्जदार याच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी २० हजाराची लाच मागितली. तक्रारदात्याला लाच दयाची नसल्याने, त्याने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची शहनिशा केल्यानंतर, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एपीआय घुनावत यांना दहा हजार रूपयांचा पहिला हफ्ता घेताना ताब्यात घेण्यात आला आहे. प्रकरणात एमाअयाडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी मदनसिंग घुनावत याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी आरोपीने दहा हजार रुपये कोणाच्या सांगण्यावरुन व कोणासाठी स्वीकारले याचा तपास करायचा आहे. आरोपी व तक्रारदार यांचे संभाषण असलेले मेमरी कार्ड तंज्ञाच्या अभिप्राया करिता पाठवायचे आहे. आरोपीचे बँक खाते पासबूक हस्तगत करायचे आहे. तसेच इतर पुरावे देखील गोळा करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.