आयपीएलचं बिगुल वाजलं ; ‘या’ संघात होणार सलामी लढत

IPL 2020

दुबई : जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून आयपीएलच्या १३व्या सिजनचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत. यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीत १९ सप्टेंबरला हा सामना रंगणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:00 वाजता) सुरू होईल. कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPLच्या नव्या वेळापत्रकानुसार, १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिला सामना होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर १० नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार आहे. 

प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजताची असणार आहे.चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर संघाचा क्वॉरन्टाईन कालावधी एका आठवड्याने वाढला होता.१९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा १३वा हंगाम रंगणार आहे. एकूण ५१ दिवस यूएईमध्ये क्रिकेटचा उत्सव साजरा होईल. सहा वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. याआधी लोकसभा निवडणुकांमुळे २०१४ मध्ये आयपीएलच्या सातव्या हंगामाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *