एम आय एम ही संघटना मुघलांचा व निजामांचा वारस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले -भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर

छत्रपती संभाजीनगर,४ मार्च  / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र शासनाने शिंदे फडणवीस सरकारने औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर केले , त्या मुळे तमाम हिंदूंच्या भावना  आनंदाने उत्साहीत , प्रफुल्लित झाल्या , परंतु काही धर्मांध जातीवादी संघटना या औरंगजेब व  निजामाचा वारसा आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले , एमआयएमचे खासदार  इम्तियाज जलील हे शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले म्हणून अंगाचा तीळ पापड करून घेत आहेत, अशी टिका भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केली.

ज्या जुलमी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारले ,अतोनात छळ केला ,त्या औरंगजेबाचे नाव शहराला होते , मागील ३५ वर्षांपासून सर्व सामाजिक संघटना व जनभावनेचा आदर राखून शिंदे फडणवीस सरकारने ही मागणी पूर्ण केली व औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर केले , या विरोधात  एम आय एम या जातीवादी  संघटनेचे कार्यकर्ते  उपोषणाला बसले आहे , त्यांच्या उपोषण स्थळी क्रूरकर्मा  हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या ,छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाचे पोस्टर झळकवले व आम्ही त्याचे वारस आहोत या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्यात आली , या मुळे तमाम हिंदूंच्या भावना दुखावल्या ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना अतोनात छळ केला , त्या धर्मांधतेचे नाव शहराला होते ते बदलून शहराचे नामकरण केले , तर यांच्या अंगाचा तीळ पापड होतोय , आणि हे सर्व तमाम हिंदूंच्या धार्मिकभावना दुखवण्या साठी हे जाणीवपूर्वक केल्या जाते या  प्रवृत्तीचा  भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी जाहीर निषेध केला .