दाऊदच्या हस्तकाला मुख्यमंत्र्यांशी होते बोलायचे : मंत्री अनिल परब

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ४ फोन कॉल दुबईच्या नंबरवरून आले. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र मातोश्रीवर एक निनावी फोन आला होता. दाऊद गँगचा हस्तक असल्याचे त्याने सांगितले. त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. मात्र, मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही, अशी माहिती परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. या कॉल बाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत खर काय ते पोलीस तपासातून समोर येईल असेही ते पुढे म्हणाले.

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेतला जातो. तो अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आलेला असल्याचेही मंत्री परब यांनी सांगितले. दुबईहून मातोश्री वर तीन ते चार फोन आल्याची माहिती आहे. मात्र, यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली नसल्याचे परब यांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर मातोश्री निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येत आहे. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री काही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत.मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मी मंत्री आहे. मातोश्री हे आमचे मंदिर आहे. जगाच्या पाठीवर मातोश्रीला हात लावणारा जन्माला यायचा आहे. त्यामुळे यातून कोणीही पुढे आला तरी त्याची हयगय करणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *