पोखरी येथे कांदा- कापूस भाववाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

वैजापूर ,४ मार्च / प्रतिनिधी :- कांदा व कापसाला भाव मिळत नसल्याने पोखरी (ता. वैजापूर) येथे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या  कांदा व कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने  निषेध नोंदविण्यात आला.

या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घ्यावी अन्यथा  तीव्र आंदोलनाला उभारण्यात येईल असा इशारा  यावेळी शेतकऱ्यांनी दिला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष प्रकाश बापू ठुबे, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा मामा मरकळ, आप्पा ठुबे बाबासाहेब ठुबे, राजू ठुबे, प्रकाश भोसले, माळोदे महाराज, शिवाजी बोडखे, जनार्धन ठुबे, मनोज ठुबे, कैलास भोसले शिवाजी ठुबे हरी काका ठुबे भाऊसाहेब ठुबे, लक्ष्मण ठुबे, सोपान ठुबे, दादासाहेब बारगळ, किरण आहेर, वाल्मिक ठुबे, रामेश्वर ठुबे, अनिल ठुबे, बापू ठुबे, मंजाहरी रोठे, ज्ञानेश्वर ठुबे, रविन्द्र् ठुबे यांच्यासह शेतकरी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.