बेलगाव येथे 78 लक्ष 70 हजार रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन


वैजापूर ,४ मार्च / प्रतिनिधी :-वैजापुर तालुक्यातील बेलगाव येथे विविध कामांसाठी आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 78 लक्ष 70 हजार रुपये निधीच्या कामांचे  भूमिपूजन शनिवारी करण्यात आले.

जलजीवन मिशन नळ जोडणी 30 लक्ष 70 हजार रुपये कामाचे भूमिपूजन, बेलगाव ते सुराळा  रस्ता दुरस्ती 20 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन, जगदाळेवस्ती रस्ता खडीकरण 10 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन, हनुमानवाडी रस्ता मजबुतीकरण 10 लक्ष रुपये कामांचे भूमिपूजन, वीरभद्र मंदीर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरण 3 लक्ष रुपये अशा एकूण 78 लक्ष 70 हजार रुपये निधीच्या मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज संपन्न झाले.       

या प्रसंगी उपनगराध्यक्ष साबेरभाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, शहरप्रमुख पारस घाटे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन साहेबराव औताडे, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, युवासेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, विभागप्रमुख बंडू पाटील जगताप, उपविभागप्रमुख बंडू पाटील गायकवाड, उपकार्यकारी अभियंता कोयलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या भूमीपूजन कार्यक्रमास सरपंच कल्पना संजय गडाख, उपसरपंच गोपीनाथ पाटील गायकवाड, रवी पाटील दंडे, तात्याराव शिरसाठ, कनिष्ठ अभियंता किरण आवारे, कचरूभाऊ गोरे, बाबासाहेब वैद्य, शेषराव गायकवाड, कारभारी वगदे, छगनराव वगदे, सचिन गडाख, सुधाकर त्रिभुवन, चिंटूभाऊ त्रिभुवन, बाबासाहेब निमसे, राहूल बागुल, यशवंतराव गायकवाड, सारंगधर देवकर, समाधान गायकवाड, जनार्दन उफाडे, विजय वलटे, सुरेश गडाख, शरद  वगदे, विजय पवार, श्रीधर गडाख, सोमनाथ गडाख, रामा गडाख यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.