जालना जिल्ह्यात 158 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि.6 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 64 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्दा रे ११० व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४८ व्यक्तींचा अशा एकुण १५८ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11746 असुन सध्या रुग्णालयात-265 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4130, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-384,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-38901 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-158(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5626 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-32536, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-639, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3711

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3587 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-143, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-738,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-55, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-265,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-143, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4053, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1418 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-56199 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 155 एवढी आहे.

जालना शहरातील इंदिरानगर परिसरातील 67 वर्षीय पुरुष, दु:खीनगर परिसरातील 74 वर्षीय महिला, कन्हैयानगर परिसरातील 71 वर्षीय पुरुष व बोरखेडी ता. जालना येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकुण 04 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या नागरीकांकडुन आजपर्यंत एकुण 4 हजार 548 नागरीकांकडुन 9 लाख 61 हजार 960 रुपये एवढा दंड वसुल करण्याात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *