नांदेड जिल्ह्यात 328 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू

208 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 6 :- रविवार 6 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 208 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 328 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 87 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 241 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 243 अहवालापैकी 842 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 8 हजार 910 एवढी झाली असून यातील 5 हजार 653 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाणे 65.80 टक्के एवढे झाले आहे. एकुण 2 हजार 937 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 256 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी हदगाव तालुक्यातील तळेगाव येथील 50 वर्षाची एक महिला, शनिवार 5 सप्टेंबर रोजी व्यंकटेशनगर कंधार येथील 85 वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील निपाणी सावरगाव येथील 70 वर्षाची एक महिला, तथागतनगर नांदेड येथील 57 वर्षाचा एक पुरुष तर रविवार 6 सप्टेंबर रोजी दत्तनगर किनवट येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर वजिराबाद नांदेड येथील 49 वर्षाचा एक पुरुष, मुदखेड शिकारा येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 265 झाली आहे.

आज बरे झालेल्या 208 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहेआजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 87 बाधित आढळले.अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 241 बाधित आढळले. जिल्ह्यात 2 हजार 937 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 55 हजार 616,निगेटिव्ह स्वॅब- 44 हजार 497,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 328,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 8 हजार 910,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10,आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 14,एकूण मृत्यू संख्या- 265,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 5 हजार 653,रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 937,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 474, आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 256.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *