दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची असंविधानिक पद्धतीने केलेली अटक मागे घ्या-आप

छत्रपती संभाजीनगर,१ मार्च  / प्रतिनिधी :-  आम आदमी पार्टी,छत्रपती संभाजी नगरच्या वतीने दिल्लीचे माजी  उपमुख्यमंत्री तथा मनीष सिसोदिया यांची असंवैधानिक  पद्धतीने  केलेली अटक मागे घ्यावी  असी मागणी औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सुभाष निकम यांनी  जिल्हाधिकारी यानां दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या वेळी आपचे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे ,मराठवाडा सचिव वैजनाथ राठोड,ज्लिहा संघटन मंत्री संजय चव्हाण ,जिल्हा सचिव दत्तु पवार ,जिल्हा महिला अध्यक्षा मेघाताई राईकवार ,सचिव जोती जाधव , कन्नड तालुका अध्यक्ष विनायक अकोलकर ,वैजापूर तालुका अध्यक्ष गोरख सिंग जारवाल ,फुलंब्री तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे ,वाळुज महानगर अध्यक्ष प्रकाश जाधव ,शंकर गावंडे , इम्रान उस्मान बिल्डर, मजाज भाई ,जनार्दन साबळे सचिन लहान, कैलास बनसोडे, विजय इंगळे ,प्रकाश बनसोडे ,मघाडे ,प्रज्ञा  बदरके,अमोल पाटणी यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे म्हणाले की,केंद्र सरकारने  दिल्लीचे माजी  उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची असंवैधानिक पद्धतीने  केलेली अटक केली आहे हे योग्य नाही.कारण दिल्ली सरकारने शिक्षण क्रांती केलेली आहे.या कामाचा डंका  विदेशात वाजत आहे.तर आपल्या देशात ही क्रांती जनतेच्या मनात रूजत आहे. या दिल्ली शिक्षण मॉडेलची  देशातील प्रत्येक नागरिक  मागणी करत आहे.यामुळेच आपची सत्ता पंजाब मध्ये आली.असेच इतर राज्यात सुद्धा होत असल्याने तसेच शिक्षणाचे काम केंद्र सरकारला खटकत असल्यानेच ही कृती केली असल्याचे मुंडे म्हणाले.ते पुढे म्हणाले की, जाणीवपूर्वक  त्यांना बदनाम करण्यासाठी ही खोटारडे  राजकारण देशाच्या हिताचे नाही.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री यांना   केलेली अटक मागे घ्या , न घेतल्यास जिल्हयात आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल या होणार्‍या परिस्थितीस सरकार जबाबादार असेल असे जिल्हा अध्यक्ष सुभाष निकम म्हणाले.