वैजापूर तालुक्यात अवैध धंद्याविरुध्द पोलिसांची कारवाई

वैजापूर ,​१ मार्च​ ​​​​/ प्रतिनिधी :- बेकायदेशीर रित्या देशी,विदेशी व गावठी दारू विक्री करणाऱ्या विरूद्ध तालुक्यात पोलिसांनी मोहिम उघडली आहे.सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी  यांच्या आदेशाने वैजापूर तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या विरूद्ध छापे मारून कारवाई केली जात आहे.मंगळवारी तालुक्यातील विविध गावात  अवैध दारू विक्री करणाऱ्या चौदा जणांविरुद्ध पोलिसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या ताब्यातून 192 देशी ,विदेशी दारूच्या बाटल्या व 50 लिटर गावठी दारू असा एकूण 24 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी नंदाबाई शेषराव शिंदे (म्हस्की), बाबुराव गोविंद फुलारे (कापुसवाडगाव), गोकुळ पिराजी सवई (अव्वलगाव), राहुल बाळु फुलारे (सिरसगाव), विठ्ठल बारकु दवंगे (मनुर), रावसाहेब जगन रावत (टुणकी),अशोक जगन्नाथ मोरे (पारळा),निश्चल विजयसिंह रामैय्या (वैजापूर),विनोद कमल दुर्वे (इंदौर मध्य प्रदेश),नितीन गायकवाड (बेलगाव ),शोभाबाई सोमनाथ सुरे , सुशीला आप्पा सूरे व जगदीश मुरलीधर बागुल (खंडाळा),किशोर गोरख राऊत (जरूळ) या चौदा जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.