जायकवाडी प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले

पैठण: कालवा व जलविद्युत केंद्रानंतर, शनिवारी जायकवाडी धरणाच्या मुख्य साडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या, प्रकल्पाच्या जलविद्युत केंद्र व साडव्यातून २६२७  क्यूसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग  करण्यात येत आहे.

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास आज दुपारी सुरुवात करण्यात आली. यापूर्वी प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून आणि जलविद्युत प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे. प्रकल्पाच्या दहा आणि २७ क्रमांकांच्या दरवाजांमधून १०२४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. आज दुपारी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ९७.५७ टक्क्यांपर्यंत पोचल्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण प्रशासनाने प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

सध्या, जायकवाडी धरणात, ६१८१ क्यूसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू आहे. तर, जलविद्युत केंद्रातून १५८९ क्यूसेक व धरणाच्या दोन गेटमधून १०४८ असा एकूण २६३७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणात, २८५६.५०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला असून यापैकी २११८.३९४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त (९८.५६ टक्के) पाणीसाठा आहे. तर धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ०.४६ फूट पाणी पातळी वाढण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *