‘तुम्ही 70 हजार कोटी पाण्यात घातले..’ मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांवर पलटवार

चहात काय सोन्याचं पाणी टाकता का? अजित पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

मुंबई,२६ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-  राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यातच शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून तयारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बिल चार महिन्यात 2 कोटी 38 लाख कसं? अशा सवाल उपस्थित केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांनी 70 हजार कोटी पाण्यात घातले. त्याचा हिशोब आम्ही विचारला का? असा पलटवार केला आहे. अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्याचे धोरणात्मक निर्णय या अधिवेशनात आम्ही घेणार आहोत. सर्व सामान्यांचे निर्णय आम्ही या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार आहोत. अडीच वर्षात बंद पडलेल्या योजना आम्ही सुरू केल्या. 22 प्रकल्प आम्ही सुरू केले. जलयुक्त शिवार यांनी सुरू केलेली योजना बंद केली ती आम्ही सुरू केली. गेल्या 6 ते 7 महिन्यात आम्ही अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू केले. यात मेट्रो प्रकल्प, पाणी शुद्धीकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचा समावेश आहे.

अजित पवार केव्हापासून कडवट व निष्ठावंत शिवसैनिक झाले? : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विरोधकांनीही यात सूचना केल्या पाहिजे. मात्र, अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतून त्याची मानसिकता कळाली. ते म्हणाले गेलो असतो तर महाराष्ट्रद्रोह झाला असता. मात्र, ज्यांचे संबध अंडरवल्डशी होते. त्यांचा राजीनामा यांनी घेतला नाही. जाऊदे बर झालं नाही आले अन्यथा आमचा देशद्रोह झाला असता. कायम घटनाबाह्य सरकार बोलले जाते. निवडणूक आयोगाने आम्हाला निर्णय दिला. ते वारंवार बोलतात लोकांमध्ये नाराजी आहे. वैगरे वैगरे. आम्ही पुण्यात गेलो. लोकांचा चांगला प्रतिसाद होता. पवारांनी दहा दहा सभा घेतल्या, अजित पवार तर गल्ली बोळ्यात फिरत होते. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी पहाटेच्या शपथ विधीवेळी निष्ठा कुठे गेली होती? अजित पवार केव्हापासून कडवट व निष्ठावंत शिवसैनिक झाले? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.

तुम्ही 70 हजार कोटी पाण्यात घातले, त्याचा हिशोब आम्ही विचारला का? : मुख्यमंत्री

आम्ही किती खर्च केला. मग माझं कुटुंब माझी जबाबदारीवर किती खर्च आला. इतरही राज्य जाहिरात करत आहेत. वर्षावरचा खर्च काढल सोन्याचा चहा. वर्षावर आता किती लोकं येतात आम्ही बिर्याणी नाही देऊ शकत पण चहा तर देऊ शकतो. अजित पवारांनी 70 हजार कोटी पाण्यात घातले. त्याचा हिशोब आम्ही विचारला का? असा थेट हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांवर केला आहे. जेव्हा फेसबुक लाईव्ह कोरोनात जात होते. त्याचे 30, 35 कोटी जात होते. याचीही माहिती घ्यायला हवी त्यांनी.