दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

नवी दिल्ली : –मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांची गेल्या आठ तासांपासून चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आलीय.

विशेष म्हणजे सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील आहेत. सिसोदिया यांच्यावर राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी त्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु होती. अखेर त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली आहे.आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. मनीष सिसोदिया यांना उद्या कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर त्यांना किती दिवसांची कोठडी दिली जाते ते कळेल.

आम आदमी पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचे पोस्टर जारी केले होते. दोन पानांच्या या पोस्टरवर मनीष सिसोदिया यांचा फोटोही छापण्यात आला होता. खोट्या गुन्ह्यांची आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती नाही. आम्ही भगत सिंह आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि आम्ही मृत्यूशी सामना करायलाच निघालोय असं सिसोदियांनी म्हटलं होतं.मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी टीका केली