पुणेकरांची मतदानाऐवजी वामकुक्षीला पसंती:दोन्ही मतदारसंघात सरासरी ५० टक्के मतदान

पुणे,२६ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :- पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानाकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याचं दिसलं. कसबा विधानसभा मतदार संघात ५०.६ टक्के मतदान पार पडलं तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी ५०.४७ मतदान पार पडलं.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये तर आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे.भाजपने कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी उतरवले आणि सगळीकडे चर्चा झाली. आजारपणातही त्यांनी भाजपच्या प्रचार सभेत हजेरी दर्शवली. तर, आता त्यांनी व्हीलचेअरवरून मतदानाला हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी अहिल्यादेवी शाळेत पोहचून मतदान केले. आजारपणातही ते मतदान करण्याचा हक्क विसरले नाहीत, म्हणून त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.