वैजापूर तालुक्यातील नागमठाण, टेंभी व कऊटगाव येथे ११ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण, टेंभी व कऊटगाव या गावातील विविध विकास कामांसाठी 11 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते रविवारी (ता.26) करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रामहरी जाधव, बाजार समितीचे माजी सभापती सभापती भागिनाथराव मगर, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, अनिल पाटील चव्हाण, शहरप्रमुख पारस घाटे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव औताडे, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील कदम, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, सतीश हिवाळे, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, रामहरी जाधव यांची यावेळी भाषणे झाली. मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्याप्रमाणात निधी मंजूर करून आणला असून तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे आमदार बोरणारे आपल्या भाषणात म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.बी.काकड, उपतालुकाप्रमुख गोरख  आहेर, सोमनाथ भराडे, गोकुळ आहेर, प्रकाश  मतसागर, नानासाहेब धोत्रे, महेश बुणगे, नगरसेवक डॉ. निलेश भाटिया, विभागप्रमुख रामनाथ तांबे, उपविभागप्रमुख बंडू गायकवाड, संजय शिंदे, भावराव तात्या दुशिंग, पप्पू हूमे, बाळासाहेब पवार, कनिष्ठ अभियंता वनवे, किरण आवारे, सरपंच श्वेतल देवदत्त पवार, विठ्ठल गवळी, डॉ गणेश चव्हाण, सिताराम  डांगे, रणजीत चव्हाण, संजय  बोरनारे, राजेंद्र जाधव, रामभाऊ धोत्रे, रामभाऊ बारसे, अतुल कुंदे, प्रकाश  पवार, शिवाजी सवई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.