शिक्षक दिनानिमित्त परभणी मनपाच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार

परभणी,
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शनिवारी(दि.पाच) महापालिकेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
बी.रघूनाथ सभागृहात सकाळी आयुक्त देविदास पवार, शिक्षण सभापती विकास लंगोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी आयुक्त देविदास पवार, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण सभापती विकास लंगोेटे हे होते. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त महेश गायकवाड, सहाय्यक आयुक्त श्रीकांत कांबळे, संतोष वाघमारे, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, प्रशासकीय अधिकारी सुधाकर किंगरे, शिक्षण विभागाच्या प्रमुख सगर आदीची उपस्थिती होती. प्रास्ताविक इक्तारखान पठाण यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मनपाच्या सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक भारती , ज्ञानेश्‍वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सगर , एकमिनार नगरातील उर्दु शाळेचे शिक्षक खदीर , जारमिल्ला शाळेतील अकबरी , बारादरी येथील सानिया बेगम, मदिनानगर येथील शाळेतील मुनवर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त देविदास पवार यांनी महानगरपालिकेतील शाळेचा शैक्षणीक दर्जा सुधारण्यात यावा, असे म्हणाले. यावेळी मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या मुख्याध्यपकांनी शाळेत विद्यार्थी संख्या वाढवली आहे तसेच शाळेत भौतिक सुविधा पुरविल्या आहेत. व शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
शिक्षण सभापती विकास लंगोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व ज्या मुख्याध्यापक व शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्या सर्वांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन शिक्षण विभागाचे प्रशासक अधिकारी सुधाकर किंगरे यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.