अंतिम वर्षाची परीक्षा ५० गुणांची, एक तासाचा वेळ

मुंबई,
अंतिम वर्ष परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल, कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग संचालक यांचेकडून शासन परिपत्रक विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे. परीक्षा तीन तासांची होणार नसून, ५० मार्कांची आणि एक तासाची असेल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.अंतिम परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटले. अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु आहे.

Image
अशी असेल परीक्षा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवून परीक्षा पद्धतीचा अवलंब करणे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला बाधा पोहचू नये यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
परीक्षा पद्धत ठरवण्यासाठी कुलगुरूंना विद्यापीठ प्राधिकरण व व्यवस्थापन परिषद यांच्याशी बैठक घेऊन 7 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेणे.
15 सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक व 1 ते 31 ऑक्टोबर परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे.
विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत अभ्यासक्रम वेळापत्रक लवकर अवगत करणे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक घेऊन परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव युजीसीला पाठवणे.
 

असा असेल पेपर

परीक्षेत 60 प्रश्न असतील. त्यातील 50 सोडवणे आवश्यक.
प्रत्येक प्रश्न 1 मार्काचा. तासाठी एक तासाची वेळ.
50 मार्क इंटर्नल, 50 मार्क एक्सटर्नल.
15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर इटर्नल परीक्षा. तर 1ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर सर्व विषयाची ऑनलाईन परीक्षा आणि निकाल.
1 नोव्हेंबरला नवे अॅडमिशन सुरू होतील.
10 नोव्हेंबरला ऑनलाईन शिकवणी सुरू होईल.
मोबाईल आणि कॉम्प्युटर असलेले 90 टक्के विद्यार्थी आहेत.
ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत त्यांना MKCL मार्फत परीक्षा देता येणार.
कोविड किंवा अपघात जखमी असेल तर MKCL त्यांची परीक्षा घेण्याची व्यवस्था करेल.

परीक्षा पद्धतीसंदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. सामंत म्हणाले, राज्यपाल महोदय यांच्या अध्यक्षेतेखाली आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत.
 
यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सद्याची परिस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल. असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्या संदर्भातील तयारी पूर्ण करावी. या बरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचेसुद्धा नियोजन करण्यात यावे. या संदर्भात चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *