इंडियन डेंटल असोसिएशनची औरंगाबाद कार्यकारिणी जाहीर: अध्यक्षपदी डॉ. प्रीतम शेलार व सचिवपदी डॉ. विजयकुमार गिऱ्हे यांची निवड

औरंगाबाद,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- इंडियन डेंटल असोसिएशनची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. यात असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार,  अध्यक्षपदी डॉ. प्रीतम शेलार व सचिवपदी डॉ. विजय कुमार गिऱ्हे यांची निवड करण्यात आली.

डॉ. विजयकुमार गिऱ्हे

उर्वरित कार्यकारिणीत 2023 साठी अध्यक्ष- डॉ. प्रितम शेलार , सचिव-डॉ. विजय गिऱ्हे, कोषाध्यक्ष- डॉ. डहाके, डॉ. अंकुश बुब, डॉ. अपेक्षा धुळे,डॉ गणवीर डॉ सोधी, डॉ राज, डॉ सायली डॉ कपूर, डॉ रोजेकर निलेश . तसेच डॉ.प्रणव महाजन,डॉ मिटकरी,डॉ. बिचिले, डॉ. गुप्ता, डॉ. भाजीभाकरे, डॉ. सुषमा शिंदे,डॉ. बंब,डॉ. घुनावत,डॉ. आनंद डॉ.वठार, डॉ गाढे, डॉ. मुजीब, डॉ. अमृता, डॉ. अश्विनी, डॉ. निलोफर, डॉ. गोविंद चांगुले , डॉ. मेहेत्रे, डॉ. अनुप,डॉ देशमुख यांची विविध समिती मध्ये निवड झाली आहे.

मावळते अध्यक्ष डॉ. सीमित शाह यांनी बैठकीला सुरुवात करून नवीन अध्यक्षाकडे कार्यभार सोपविला,बैठकीत मौखिक आरोग्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.येणाऱ्या काळात डेंटिस्ट साठी असोसिएशन तर्फे मोफत सीडीइ  प्रोग्राम व डेंटल कार्यशाळा, मेडिको लीगल प्रशिक्षण राबविण्यात येतील, तसेच पुढील महिन्यात औरंगाबाद मध्ये राष्ट्रीय दंत परिषद होणार असून त्यासाठी भारतातून विविध भागातून 500 ते 700 डेंटिस्ट औरंगाबादला  येणार असून पर्यटन ही करणार आहेत ,असे असोसिएशन चे डॉ. प्रितम व डॉ घुनावत  यांनी सांगितले.

तसेच येणाऱ्या काळात मौखिक कॅन्सर जनजागृती,  विविध शाळा- महाविद्यालय, सर्वजनिक ठिकाणी मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात येणार असल्याचेही डॉ. गिऱ्हे जाहीर केले . सर्व खासगी रुग्णालयात दातांच्या उपचारासाठी एकच मुल्य निर्धारित करण्यात येणार असल्याचेही डॉ. शेलार यांनी सांगितले.यावेळी डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया चे डॉ. नरेंद्र काळे यांनी नियोजनबद्ध प्रॅक्टिस साठी काय करावे व काय करू नये यावर सर्व उपस्थित डेंटिस्टला मार्गदर्शन केले , डॉ भताने, आयएमएचे अध्यक्ष डॉ. फडणीस, सचिव डॉ. उज्वला दहिफळे, घाठीचे डॉ. महिंद्रा, डॉ सुजित परदेशीं, डॉ. लाठी, डॉ. प्रणव आगळे उपस्थित होते.