जालना जिल्ह्यात 151 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि.3 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअरर सेंटरमधील 275 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.एकुण 151 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11209 असुन सध्या रुग्णालयात-257 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3992, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-366, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-36284 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-151 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5088 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-30594, रिजेक्टेड नमुने-47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-502, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3599

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-28, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3514 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-177, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-479, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-56, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-257, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-60, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-275, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3871, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1067 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-54189 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 150 एवढी आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवली नेर येथील 42 वर्षीय पुरुष, मुरमा ता. घनसावंगी येथील 45 वर्षीय पुरुष अशा एकुण दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *