कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या संख्येने सुविधा निर्माण करण्याच्या विभागीय आयुक्तांकडून शासकीय यंत्रणांना सूचना

कोविड उपचार रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस,कोरोनासाठी उपचार घेणाऱ्या रूग्णांनी व्यक्त केल्या भावना

बीड, दि. ३ ::– मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज कोरोना वरील उपाययोजनांबाबत आढावा घेण्यासाठी बीड जिल्ह्यात भेट दिली यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील covid-19 उपचार केंद्रात दाखल रुग्णांची थेट भेट घेऊन विचारपूस केली.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार , मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार होते.

यावेळी कोवीड वॉर्डात दाखल वयोवृद्ध रुग्णांनी त्यांच्यावर होत असलेल्या उपचारांबाबत समाधान व्यक्त करताना येथील भोजन सुविधा चांगल्या असल्याचे सांगितले यावेळी शासन आणि प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांसाठी दुवा दिल्या.जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचा “थेट आखो देखा हाल” विभागीय आयुक्तांनी श्री. केंद्रेकर यांनी यावेळी जाणून घेतला याप्रसंगी त्यांच्या समवेत सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी पीपीई किट घालून कोरोना वार्डातील सुविधांची पाहणी केली.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज बीड जिल्ह्यास भेट दिली या भेटीदरम्यान श्री. केंद्रेकर यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर , निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार व अपर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील covid-19 कोरोना संसर्ग बाधित रुग्णांसाठी करण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा वाढवणे, सौम्य व गंभीर लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांचे उपचार पद्धती कोविड केअर सेंटर आणि कोरोना (covid-19) उपचार रुग्णालय येथील प्रमाणित प्रक्रिया पद्धती(sop ), येत्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्याकडून करावयाची तयारी याबाबत आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

येत्या काही महिन्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत असून यामध्ये अधिकाधिक वैद्यकीय सुविधा निर्माण करण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णांसाठी मोठ्या संख्येने ऑक्सीजन यंत्रणा असलेल्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे यासाठी कोविड केअर सेंटर असलेल्या ठिकाणी ऑक्सीजन यंत्रणा निर्माण करणे तसेच जिल्ह्यातील मंगल कार्यालय आणि विविध मठांच्या ठिकाणी असलेल्या लाॅकडाऊनमुळे बंद विना उपयोग असलेल्या मोठ्या जागांचा वापर रुग्णांना दाखल करून उपचार करण्यासाठी होईल.

जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येसाठी 2000 ऑक्सिजन बेडची तातडीने व्यवस्था निर्माण करणे यासाठी कार्यवाही करण्याचे प्रशासनास सु्चित केले.यावेळी नागरिकांनी कोरोना च्या दृष्टीनेआरोग्याची सुरक्षाविषयक काळजी घ्यावी. यासाठी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे , सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे व वैयक्तिकरित्या मास्क , हॅन्ड ग्लोज व सॅनिटायझर याचा वापर करण्याकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या.तसेच या बैठकीनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी श्री रेखावार जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तरी कुंभार जिल्हा शल्य चिकित्सक थोरात आणि होते याप्रसंगी त्यांनी अंतर्गत covid-19 उपचार रुग्णालयास भेट देऊन रुग्णांची माहिती घेतली केली. तसेच भोजन सुविधा , स्वच्छता आणि कोविड वॉर्ड मधील विविध सोई सुविधांची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *