एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा भारताचा नवा उच्चांक,24 तासात 68,584 रुग्ण बरे

24 तासांत 11.7 लाखाहून अधिक लोकांच्या चाचण्या करीत भारताने यशाचे आणखी एक शिखर गाठले

नवी दिल्ली,  3 सप्टेंबर  2020

एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक भारताने नोंदविला आहे. गेल्या 24 तासांत कोविड -19 चे 68,584 रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत जवळपास 30 लाख (2,970,492) वाढ झाली आहे.

यामुळे, कोविड -19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 77% पेक्षा (77.09%) अधिक झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या संख्येपेक्षा (8,15,538) 21.5 लाखांनी जास्त झाली आहे.

आजमितीस बरे झालेले रूग्ण सक्रिय  पेक्षा 3.6 पटीहून अधिक वाढले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाने विक्रमी पातळी गाठल्याने सक्रीय रुग्णांमध्ये घट झाली आहे आणि सध्याच्या एकूण प्रकारणांपैकी केवळ 21.16 %च सक्रिय आहेत.

रुग्णालयांमधील सुधारित आणि प्रभावी नैदानिक उपचार, गृह अलगीकरणाचे पर्यवेक्षण, ऑक्सिजन समर्थन, रुग्णांना तातडीने आणि वेळेवर उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सुधारित सेवा, कोविड -19 रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नैदानिक व्यवस्थापन कौशल्यांच्या वृद्धीसाठी नवी दिल्लीच्या एम्सद्वारे, दूरस्थ सल्लागार सत्रांद्वारे तांत्रिक मार्गदर्शन, स्टिरॉइड्स आणि रक्ताच्या गुठळ्या थांबवणारी औषधे इत्यादींचा एकत्रित परिणाम म्हणून अखंड कार्यक्षम रुग्ण व्यवस्थापन केले गेले.

या उपाययोजनांद्वारे भारतातील कोविडने होणारा मृत्यु दर (सीएफआर) जागतिक सरासरीच्या (3.3%) खाली राखला गेला आहे. या मृत्युदरात दररोज घट होत असून तो आज 1.75% वर आहे.

एकूण चाचण्या 4.5 कोटींपेक्षा अधिक

गेल्या दोन दिवसांपासून दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या घेण्याचा सपाटा सुरू ठेवत, भारतामध्ये दैनंदिन चाचण्यांमध्ये आज अभूतपूर्व वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासांत 11.7 लाखांहून अधिक (11,72,179) चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या यशामुळे संचयी चाचण्या 4.5 कोटींपेक्षा अधिक (4,55,09,380) झाल्या आहेत.

यातून दररोजच्या कोविड-19 चाचण्यांमधील भारतातील चाचण्यांचे घातांकीय वाढीचे प्रमाण दर्शविते. 30 जानेवारीपासून दररोज 10 चाचण्या घेण्यास प्रारंभ झाल्यापासून, आजमितीला रोजची सरासरी 11 लाखांपुढे गेली आहे.

भारतातील रोजचा चाचणीचा दर हा जगातील उच्च दरांपैकी एक आहे. विस्तीर्ण भागात ठराविक काळासाठी अशा उच्च पातळीवरील चाचण्या लवकर निदान करण्यास सक्षम करतात आणि त्याचे रूपांतर अखंड विलगीकरण आणि प्रभावी रुग्णालयात दाखल करण्याच्या सुविधांमध्ये होत आहे. त्यामुळे अखेरीस मृत्यूदराचे प्रमाण कमी होते. चाचणीची उच्च संख्या देखील परिणामी बाधित रुग्णसंख्येचा दर कमी करते.

देशभरातील चाचणी प्रयोगशाळेच्या जाळ्यांमधील तितक्याच वेगवान विस्तारामुळे चाचणीतील ही वाढ देखील शक्य झाली आहे. भारतात आज 1623 प्रयेगशाळा देशभरात आहेत, 1022 प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि 601 खासगी प्रयोगशाळा आहेत. यातील समाविष्ट होणाऱ्यांमध्ये :

  • रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 823 :  (शासकीय : 465 + खासगी :  358)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 678 (शासकीय : 523 + खासगी : 155)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 122 : (शासकीय :  34 + खासगी 88)

तसेच, 5 ठिकाणी कोबास 6800/8800 मशीन अत्याधुनिक उच्च दर्जाची यंत्रणा बसविण्यात आली आहे : आयसीएमआर – राजेंद्र मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, पटना; आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॉलरा अँड इंटरिक डिसीजेज, कोलकाता; नॅशनल सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल, दिल्ली; आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबई; आणि आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्च, नॉएडा. येथे दररोज कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह सुमारे 1000 चाचण्या करता येऊ शकतात.

मोठी शहरे / शहरी भाग चाचण्यांनी मोठ्या प्रमाणावर व्याप्त असतानाच पहिल्या टप्प्यात चाचणी क्षमतांमध्ये आरटी – पीसीआर चाचणी वाढविण्यात आली, जी सुवर्ण मानक ठरली, याबरोबरच दुसऱ्या टप्प्यात जिल्हा पातळीवर मॉलीक्युअर अॅसे (assay) तत्वावरील चाचण्या वाढविण्यात आल्या. तिसऱ्या टप्प्यात, प्रतिबंधित क्षेत्रात आणि रुग्णालयांमध्ये ज्या ठिकाणी मॉलीक्युलर चाचण्या उपलब्ध नव्हत्या, तेथे अंटिजेन चाचण्या करण्यास सुचविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *