केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक आयुक्तांचे औपचारिक स्वागत

नवी दिल्ली,  3 सप्टेंबर  2020

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज नवे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आज आयोगाच्या बैठकीत औपचारिक स्वागत केले.  यावेळी आयोगातील इतर अधिकारी, सरचिटणीस उमेश सिन्हा, उप निवडणूक आयुक्त, संचालक आणि वरिष्ठ प्रधान सचिव उपस्थित होते.

राजीव कुमार यांचे  स्वागत करतांना, मुख्य निवडणूक आयुक्तांनी विविध विभागातील त्यांच्या दीर्घ आणि समृद्ध प्रशासकीय आठवणींना उजाळा दिला. विशेषतः कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार विभाग, बँकिंग आणि वित्तविभागात काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे, असे ते म्हणाले. आयोगाला त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांचा मोठा लाभ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोग एक वैशिष्ट्यपूर्ण कुटुंब असून, निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी, तसेच आपले वेगळे अस्तित्व कायम राखण्यासाठी आयोगाला केंद्र आणि राज्यसरकारांची मदत हवी असते, असेही मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले. भारतीय राज्यघटनेतील उद्दात्त उद्दिष्टे-विशेषतः राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील तत्वे अधिक बळकट करणे आयोगाची कटिबद्धता आहे. निवडणूक आयोगाने अलीकडे केलेल्या काही कामांचा, विशेषतः, आयटी चा वापर, सर्वसमावेशन आणि उपलब्धता या क्षेत्रात केलेल्या कामांचा उल्लेख केला.

आपल्या स्वागतपर भाषणात, सुशील चंद्रा यांनी याआधी राजीव कुमार यांच्यासोबत केलेल्या कामांचे अनुभव सांगितले. कुमार यांच्या विचारातील स्पष्टता आणि कष्ट करण्याच्या प्रवृत्तीचे त्यांनी कौतुक केले.

आपल्या भाषणात, राजीव कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त चंद्रा यांनी केलेल्या हृद्य स्वागताबद्दल त्यांचे आणि इतरांचे आभार मानले. या स्वागताविषयी त्यांनी कृतज्ञ भावना व्यक्त केली. या संस्थेच्या महत्वाबद्दल बोलतांनाचा, त्यांनी आयोगाच्या कामात आपले सर्वोत्कृष्ट योगदान देऊ, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *